अमरावती - तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात बैल सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत चिमुकले उत्साहात सहभागी झाले. लहान मुलांसह त्यांच्या पालकांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
श्री कॉलनी मंदीर परिसरात गेल्या सात वर्षांपासून तान्हा पोळा आयोजित करण्यात येतो. भर पावसात परिसरातील शेकडो चिमुकले सुंदर अशा वेशभुषेत माती आणि लाकडाचे बैल घेऊन स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी चिमुकल्यांची वेशभूषा आणि बैलांची सजावट यासाठी बक्षिसही प्रदान करण्यात आले.
यावेळी, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत डेहणकर, डॉ.हृषिकेश नागलकर,रश्मी नागलकर,डॉ.अविनाश काळे, मंदिराचे विश्वस्त माणिकराव पाचघरे, मुकुंद बर्गी,प्रदीप ठाकरे आदी उपस्थीत होते. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शिल्पा पाचघरे, संध्या देशमुख,श्रुती जोशी,श्वेता मामुरकर, वैष्णवी देऊळकर, शितल वाघमारे आदींनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.