ETV Bharat / state

Operation of Woman Amravati : महिलेवर शस्त्रक्रिया करताना हलगर्जीपणा; दीड वर्षांनी गुन्हा दाखल - महिलेवर चुकीची शस्त्रक्रिया अमरावती

दीड वर्षांपूर्वी अमरावती शहरातील रणतश्री हॉस्पिटलमध्ये ( Ranatshri Hospital Amaravati MH ) भारती मोहोकर या महिलेच्या गर्भपिशवीची शस्त्रक्रिया सुरू असताना शस्त्रक्रिया दरम्यान रक्तत्राव झाला होता. चुकीच्या पध्दतीने उपचार झाल्याचा आरोप करत मोहोकर यांनी दीड वर्षांपूर्वी डॉ. अमित मालपे ( Dr. Amit Malpe Amravati ) विरुद्ध अमरावतीच्या गाडगे पोलिसांत ( Gadge Nagar Police Station ) तक्रार दाखल केली होती.

gadge nagar police station
गाडगेनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : Jan 15, 2022, 5:22 PM IST

अमरावती - दीड वर्षांपूर्वी अमरावती शहरातील रणतश्री हॉस्पिटलमध्ये ( Ranatshri Hospital Amaravati MH ) भारती मोहोकर या महिलेच्या गर्भपिशवीची शस्त्रक्रिया सुरू असताना शस्त्रक्रिया दरम्यान रक्तत्राव झाला होता. या दरम्यान रक्तस्राव थांबण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य गरम कॉन्ट्री हे डॉक्टरने रुग्ण भारती मोहोकर यांच्या मांडीवर ठेवण्यात आल्याने त्यांना इजा झाली होती. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने उपचार झाल्याचा आरोप करत मोहोकर यांनी दीड वर्षांपूर्वी डॉ. अमित मालपे ( Dr. Amit Malpe Amravati ) विरुद्ध अमरावतीच्या गाडगे पोलिसांत ( Gadge Nagar Police Station ) तक्रार दाखल केली होती.

संबंधित महिला याबाबत बोलताना

दरम्यान या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर आता संपूर्ण चौकशी झाल्यानंतर पोलिसांनी डॉ. अमित मालपे विरुद्ध ६ जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान उर्वरित चारही डॉक्टरवर कारवाई व्हावी, अशी मागणी भारती मोहोकर यांनी केली आहे. अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी चौकशी करुन वैद्यकीय तज्ञांच्या अहवालावरून अमित मालपे (रा. विवेकानंद कॉलनी, अमरावती) या डॉक्टर विरुद्ध हलगर्जीपणा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला आहे. दीड वर्ष यात चौकशी झाली व चौकशी अंती दोषी एका डॉक्टरवर कारवाई झाली तर दोषी चारही डॉक्टरवर कारवाई व्हावी, अशी मागणी संबंधित महिलेने केली आहे. दरम्यान, या महिलेला न्याय मिळावा, यासंबंधीचे वृत्त ईटीव्ही भारतने दिले होते.

काय आहे प्रकरण?

अमरावतीमध्ये फार्मासिस्ट म्हणून 17 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या खापर्डे बगीचा परिसरातील रहिवासी महिलेला वर्षभरापूर्वी मासिक पाळी दरम्यान अतिशय वेदना व रक्तस्त्राव होत होता. यामुळे त्या स्त्री रोगतज्ञ डॉ. स्नेहा राठी यांच्याकडे गेल्या होत्या. सोनोग्राफी दरम्यान त्या महिलेच्या गर्भ पिशवीला सूज असल्याचे आढळून आले होते. यामुळे डॉ. स्नेहा राठी यांनी त्यांना 4 डिसेंबर 2020ला गर्भ पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये कुठलीही विसंगती आढळून आली नाही. त्यामुळे 11 डिसेंबर 2020ला शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. डॉ. स्नेहा राठी यांच्या रतनश्री हॉस्पिटलमध्ये डॉ. नेहा राठी यांच्यासह डॉ. अमित मालपे, डॉ. दिपाली देशमुख आणि डॉ. जयेश इंगळे या डॉक्टरांच्या पथकाने संबंधित महिलेवर शस्त्रक्रिया सुरू केली. अर्ध्या तासांत ही शस्त्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते.

हेही वाचा - Amaravati Vaccination : पहिल्या लसीकरणात हात बधिर, तर दुसऱ्या डोसमध्ये निकामी होण्याचा दावा..

या गोंधळात भारती मोहोकार यांच्या उजव्या मांडीवर शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे साधनही बराच वेळ ठेवण्यात आले. यामुळे भारती मोहोकार यांची मांडी गंभीररित्या भाजली गेली. या डॉक्टरांना नेमकी शस्त्रक्रिया करता आली नसल्यामुळे त्यांनी एका तिसऱ्या सर्जनला बोलावून सदरची शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेसाठी भारती मोहोकार यांच्या पतीकडून 50 हजार रुपये डॉ. स्नेहा राठी यांनी जमा करून घेतले होते. या शस्त्रक्रियेनंतर दहा दिवस त्यांना रतनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान मांडीवरील जखमेवर कुठलाही योग्य उपचार करण्यात आला नाही. मांडीवर कुठलाही उपचार झाला नसल्यामुळे भारती मोहोकार यांना मांडीवरील 22 टक्के भागावर प्लास्टिक सर्जरी करावी लागली. या संपूर्ण प्रकरणामुळे मनस्ताप सहन करावा लागला. तसेच, डॉक्टरांकडून अतिरिक्त पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी आता तब्बल दीड वर्षानंतर या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.