अमरावती - शहरात आणखी एक कोरोना रुग्ण असल्याचे स्वॅब चाचणीत स्पष्ट झाले आहे. आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या 6 झाली आहे. त्यापैकी एक दगावला आहे. गंभीर म्हणजे 12 एप्रिलला नुराणी चौक परिसरात अचानक दगवलेल्या ऑटो चालकाचा हा मुलगा आहे.
नव्याने आढळलेला कोरोना रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होत. एका खासगी रुग्णालयातून त्यास कोविड रुग्णालयात काही दिवसांपूर्वी हलविण्यात आले होते. आज (शनिवारी) त्याच्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे. 12 एप्रिलला जो ऑटोचालक दगावला त्याला कोरोना होता की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. त्याच्या कुटुंबीयांना मात्र क्वारंटाईन करण्यात आले होते. क्वारंटाईनमध्ये असताना ऑटो चालकाच्या 22 वर्षीय मुलाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - राज्यात ११८ नवीन रुग्णांचे निदान, एकूण रुग्ण संख्या ३३२० वर - राजेश टोपे
अमरावतीत पहिला कोरोनाग्रस्त 3 एप्रिलला आढळला होता. त्यानंतर 7 एप्रिलला 3 आणि 12 एप्रिलला 1 असे 5 कोरोनाग्रस्त अमरावतीत असल्याचे समोर आले. आज (शनिवारी) पुन्हा कोरोना रुग्णाच्या संख्येत नव्याने वाढ झाली आहे.