ETV Bharat / state

मेळघाटात आणखी एक अघोरी कृत्य; २६ दिवसीय चिमुकलीच्या पोटावर दिले चटके - अंधश्रद्धेतून बाळाला चटके न्यूज

अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका २६ दिवसीय चिमुकली मुलीच्या पोटावरही गरम चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील बारुगव्हाण या गावात ही घटना घडली.

one month baby girl clicked over body due to superstiion in melghat amravati
मेळघाटात अघोरी कृत्य..! २६ दिवसीय चिमुकलीच्या पोटावर दिले चटके
author img

By

Published : Jun 20, 2020, 10:16 AM IST

Updated : Jun 20, 2020, 12:15 PM IST

अमरावती - मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील एका आठ महिन्याच्या मुलाच्या पोटावर गरम विळ्याने शंभर चटके (डंबा) देण्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, अशाच प्रकारे अंधश्रद्धेतून पोटफुगीवर उपचार म्हणून एका २६ दिवसीय चिमुकली मुलीच्या पोटावरही गरम चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील बारुगव्हाण या गावात ही घटना घडली आहे. दरम्यान, त्या मुलीवर चुरणी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

चिखलदरा तालुक्यातील बारूगव्हाण या गावातील सुनीता चिमोटे या महिलेच्या २६ दिवसाच्या चिमुकलीचे पोट फुगले होते. तिला रुग्णालयात नेण्याऐवजी घरीच पोटावर गरम चटके (डंबा) देण्यात आले आहे. मेळघाटात कुपोषणाची समस्या असल्याने आणि आदिवासींमध्ये असलेला अशिक्षितपणा यामुळे मेळघाटात मोठ्या प्रमाणावर विविध आजारावर पोटावर डंबा देण्याची अघोरी प्रथा आहे. या प्रथेतून आजारी लोकांना पोटावर चटके देण्यात येतात.

आदित्य पाटील बोलताना...

काही तासांपूर्वीच मेळघाटात आजारी पडल्याने एका आठ महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके देण्यात आले आहेत. संबंधित प्रकार चिखलदरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम बोरदा गावात घडला. या प्रकरणात मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चटके देण्यास प्रवृत्त करणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, ही प्रथा चालवणाऱ्या बुवांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकत्यांमधून होत आहे. पंरतु मंत्रिकाच्या भीतीमुळे अनेक प्रकरणामध्ये पोलिसात तक्रारच होत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरिप; शेतकरी वर्गातून समाधान

हेही वाचा - संतापजनक... मेळघाटात आठ महिन्यांच्या बाळाला गरम विळ्याचे चटके

Last Updated : Jun 20, 2020, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.