अमरावती : पदवीधर मतदारसंघासाठीचे मतदान ३० तारखेला पार पडले. बडनेरा रोडवरील नेमाणी गोडाऊन येथे तब्बल ३० तास मतमोजणी सुरू होती. दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठी या ठिकाणी बोलावण्यात आले होते. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून तर आज दुपारी उशिरापर्यंत ही मतमोजणी सुरू होती. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
मतमोजणीची घाई अन् हृदयविकाराचा झटका : मतमोजणीचे कार्य करत असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडल अधिकारी शाहूराव सी. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवंगत खडसे यांना निवडणूक प्रशासन, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मतमोजणी प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. या सर्वांना व्दितीय टप्प्यातील प्रशिक्षण उपायुक्त पुनर्वसन गजेंद्र बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले होते. प्रथम प्रशिक्षण 27 जानेवारी रोजी देण्यात आले होते.
मतमोजणीबाबतची रंगीत तालीम : प्रशिक्षणामध्ये मतमोजणीच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया पॉवरपॉईंट प्रात्यक्षिकेव्दारे समजावून सांगण्यात आल्या होत्या. यामध्ये मतपत्रिकेची तपासणी, मतमोजणी कक्षातील कार्यवाही, मतपत्रिकेची विभागणी आदींबाबत घ्यावयाची काळजी या संदर्भात अधिकार्यांना पूर्णतः मार्गदर्शन करण्यात आले होते. मतमोजणी गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी नेमानी गोडाऊन, बडनेरा रोड येथे होणार आहे. प्रशिक्षणानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकारी यांची नेमानी गोडाऊन येथे मतमोजणीबाबतची रंगीत तालीमही घेण्यात आली. पिजन होल संरचना, अंतिम टॅब्युलेशन व निकालपत्र तयार करणे, निकाल जाहीर झाल्यानंतर सिलींगचे कामकाजाबाबत घ्यावयाच्या दक्षता आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरसन करण्यात आले होते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका अधिक : जसं जसं तापमान कमी होऊ लागतं तसं तसं शरीर आवश्यक अवयवाचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करतं त्यातूनच हृदयविकाराचा धोका सुरू होतो. अनेक जणांसाठी हिवाळा आनंददायी असतो. बर्फाच्छादित डोंगर पाहून त्यांना नक्कीच भुरळ पडते; पण त्याचे धोकेही काही कमी नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तापमान घट होताच शरीरात अनेक बदल सुरू होतात. कारण आपलं शरीर एका ठराविक तापमानात संतुलित राहत. जसं जसं तापमान कमी होऊ लागतं तसं तसं, शरीर आवश्यक अवयवाचा तपमान संतुलित ठेवण्यासाठी आपातकालीन प्रतिसादल सक्रिय करतं. त्यातूनच हृदयविकाराचा धोका सुरू होतो. जाणून घ्या या मागची कारणे आणि उपाय.
कॅटेगोलामाईन्सची पातळी वाढते : हिवाळ्यामध्ये शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. हिवाळ्यात विशिष्ट तापमान कायम राहावे, यासाठी संरक्षणात्मक व्यवस्थापन म्हणून शरीरातील कॅटेगोलामाईन्सची पातळी वाढते. त्यामुळे ब्लड प्रेशर वेगानं वाढते. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता खूप वाढते. ही जोखीम प्रामुख्याने हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिक असते.