ETV Bharat / state

अमरावतीत पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली अश्लील नृत्य - तिवसा मतदार संघ

कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त कुटुबीयांना मदत देण्याच्या नावाखाली चक्क मुला-मुलींचे अश्लील नृत्य आयोजीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तिवसा येथे आयोजीत कार्यक्रम
author img

By

Published : Sep 15, 2019, 4:08 PM IST

Updated : Sep 15, 2019, 4:39 PM IST

अमरावती - तिवसा मतदार संघात येणाऱ्या मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात युवक काँग्रेसने भर चौकात मुलींचे अश्लील नृत्य आयोजित केले. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त कुटुबीयांना मदत देण्याच्या नावाखाली चक्क मुला-मुलींना नाचवल्यामुळे समाज माध्यमावर निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तसेच तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचा फलक स्टेजवर लावण्यात आला होता.

तिवसा येथे आयोजीत कार्यक्रम

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात मोठ्या प्रमाणावर गणपती उत्सव साजरा केला जातो. यानिमीत्त बुधवारी विविध मंडळांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. दरम्यान, गावातील शिवशक्ती गणेश मंडळाच्या मंचावरच मुलींच्या अश्लील नृत्याचा कार्यक्रम झाला. मात्र, या कार्यक्रमाशी आमचा कुठलाही सबंध नसून या कार्यक्रमाचा खर्च हा युवक काँग्रेसने केल्याचा शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - बीडमध्ये फुटणार राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ, पक्ष पडझडीच्या काळात पवारच मैदानात

दरम्यान, मुला-मुलींच्या अश्लिल नृत्याचा कार्यक्रम आयोजित करणारे लोक, तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचेच कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर सर्वस्तरांवरून टिका केली जात आहे.

त्या कार्यक्रमात मुली नसून किन्नर आहेत - आमदार यशोमती ठाकूर

आमदार यशोमती ठाकूर यांच्या सोबत या प्रकाराबाबत बातचीत केली असता त्यांनी त्या कार्यक्रमात मुली नसून किन्नर होते असे सांगितले आहे. तसेच गेले दोन ते तीन वर्षांपासून अशाचा प्रकारे किन्नर यांचा समावेश असलेला कार्यक्रम घेतला जाते, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Intro:अमरावती : पूरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली काँग्रेसने नाचवलेल्या मुलींचे भर चौकात अश्लिल नृत्य.

अमरावतीच्या नेर पिंगळाई गावातील धक्कादायक प्रकार .
-----------------------------------------------
अमरावती अँकर
कोल्हापूर सांगली मधील पूरग्रस्त कुटूंबियांना मदत देण्याच्या नावाखाली तिवसा मतदार संघात येणाऱ्या मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात युवक काँग्रेसने भर चौकात नाचवलेल्या मुलींनी अश्लिल नृत्य केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पूरग्रस्त कुटुंबाना मदत देण्याच्या नावाखाली युवक कॉंग्रेसने चक्क मुला मुलींना नाचवल्या मुळे समाज माध्यमावर निषेध केला जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या बॅनर्स समोरच अश्लिल नृत्याचा हा धिंगाणा सुरु होता .

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात मोठ्या प्रमाणावर गणपती उत्सव साजरा केल्या जातो. बुधवारी विविध मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते.यातील याच गावातील शिवशक्ती गणेश मंडळाच्या स्टेज वरच मुलींच्या अश्लील नृत्याचा कार्यक्रम झाला.

परन्तु या कार्यक्रमाशी आमचा कुठलाही समंध नसून या कार्यक्रमाचा खर्च हा युवक काँग्रेसने केल्याचा शिवशक्ती गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच म्हणणे आहे.
दरम्यान मुला मुलींच्या अश्लिल नृत्याचा कार्यक्रम आयोजित करणारे हे तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांचेच कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.एकीकडे मुलींना नाचवन्याची बंदी असतांना सुद्धा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भर चौकात मुलींना नाचवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
-----------------------------------------------------------------------Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 15, 2019, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.