ETV Bharat / state

Amravati University: सिनेट निवडणुकीत तिहेरी चुरस, अभविप आणि जास्टिस पॅनल देणार नुटाला टक्कर - नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadgebaba Amravati University) सिनेट निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. (Amravati University Senate election). विद्यापीठावर अधिराज्य गाजवणाऱ्या नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन अर्थात नुटा (NUTA) विरोधात या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि जस्टीस पॅनल (Justice Panel) टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Amravati University Senate election
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुक
author img

By

Published : Nov 3, 2022, 7:39 PM IST

Updated : Nov 3, 2022, 8:59 PM IST

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadgebaba Amravati University) सिनेट निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. (Amravati University Senate election). विद्यापीठावर अधिराज्य गाजवणाऱ्या नागपूर विद्यापीठ टीचर्स असोसिएशन अर्थात नुटा (NUTA) विरोधात या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि जस्टीस पॅनल (Justice Panel) टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेपासून ही आठवी सिनेटची निवडणूक आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुक

असे आहे विद्यापीठातील राजकारण: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना 1983 मध्ये झाली. त्यानंतर सिनेटची पहिली निवडणूक 1989 मध्ये घेण्यात आली होती. पहिल्या निवडणुकीपासूनच नुटा ही संघटना विद्यापीठाच्या राजकारणात सक्रिय आहे. प्राध्यापक बीटी देशमुख यांच्या नेतृत्वात या संघटनेचे अमरावती विद्यापीठावर वर्चस्व कायम राहिले आहे. नुटाच्या विरोधात सुक्टा अर्थात संत गाडगेबाबा अमरावती अमरावती युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने पहिल्यांदा 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत पॅनल घोषित केले होते. सुक्टाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर संतोष ठाकरे हे स्वतः 2002 मध्ये झालेल्या सिनेट निवडणुकीत नुटाचे दिग्गज उमेदवार प्राध्यापक प.सी काणे यांना पराभूत करून निवडून आले होते. त्यानंतर डॉक्टर संतोष ठाकरे यांनी 2005 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ही नवी संघटना स्थापन केली. 2005 आणि 2010 या दोन्ही निवडणुकीत नुटा आणि सुक्टा एकमेकांविरोधात होत्या. 2017 च्या निवडणुकीत मात्र सुक्टा मधील अनेक सदस्य हे प्राचार्य झाले आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्राचार्य फोरम या नव्या संघटनेची स्थापना झाल्यामुळे सुक्टामधील अनेक सदस्य नुटामध्ये गेले तर प्राचार्य फोरम ही संथटना विद्यापीठाच्या राजकारणात नव्याने समोर आलेल्या शिक्षण मंचला रोखण्यासाठी नुटा सोबत होती. 2017 ची निवडणूक ही विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार झाली होती. या निवडणुकीत नुटाचे 37 पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. राज्यपाल आणि कुलगुरू नामीत सदस्यांमध्ये सर्व शिक्षण मंचाचे सदस्य सभागृहात आले होते.

अशी आहे सदस्य संख्या: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची संख्या एकूण 70 इतकी आहे. यापैकी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमधून दोन आमदार दोन नगरसेवक दोन शिक्षकेतर कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही थेट राज्यपालांकडून केली जाते. यासह समाजातील विविध क्षेत्रातील एकूण दहा जणांची नियुक्ती ही कुलगुरूंद्वारे करण्यात येते. यासह विद्यापीठातील 10 अधिकाऱ्यांची नियुक्ती नियमानुसार होते. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून प्रत्येकी 10 हे निवडणुकीद्वारे सभागृहात निवडून जातात. शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले शिक्षक आणि प्राचार्यांपैकी आठ जणांची निवडणुकीद्वारे निवड सभागृहातील शिक्षकांत द्वारे व्यवस्थापन परिषदेसाठी केली जाते.

नुटा पुन्हा सज्ज: नुटा यावेळी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवीत आहे. व्यवस्थापन परिषदेत देखील नोटाचे समर्थक प्रतिनिधी लढत देत आहेत. आतापर्यंत उमेदवारांच्या अर्जांची जी छाननी झाली त्यामध्ये नुटाचे दोन उमेदवार अविरोध निवडून आले असल्याची माहिती नुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. 2017 च्या निवडणुकीत नुटाला 70 टक्के यश मिळाले होते. या निवडणुकीत देखील नुटा पूर्ण ताकदीने उतरली असून राज्य आणि केंद्र स्तरावर शिक्षकांच्या संबंधित मागण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या आमच्या संघटनेला या निवडणुकीत भरगोस यश प्राप्त होईल, असा विश्वास प्राध्यापक डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देखील मैदानात: सिनेटच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंच यांची आघाडी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पदवीधर मतदार संघातील सर्व दहा जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. आम्ही विद्यार्थी केंद्रीत भूमिका घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्या विद्यापीठाने पूर्ण कराव्यात यासाठी थेट सभागृहात जाण्याची भूमिका आम्ही या निवडणुकीत घेतली असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सिनेट निवडणूक प्रमुख प्राध्यापक डॉक्टर स्वप्नील पोद्दार 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना म्हणाले. या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचच्या वतीने 20 हजाराच्या वर पदवीधरांची नोंदणी केली आहे. कोविड काळात आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क रद्द करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन छेडले आणि ह्या आंदोलनाला यश आले होते. यासोबतच मागच्या निवडणुकीत आमचे जे तीन प्रतिनिधी सभागृहात होते त्यांच्या माध्यमातून आम्ही विद्यापीठात येणाऱ्या बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील विविध भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा विद्यापीठात उपलब्ध व्हावी अशी जी मागणी केली होती ती मागणी देखील मान्य झाली आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात विविध विभागात जाण्यासाठी येथेच सायकली उपलब्ध करण्यात आल्या. त्यासाठीचा पाठपुरावा देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेच केला. आता या निवडणुकीत आम्ही निश्चितच विजयी होऊ आणि विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका सभागृहात घेऊ, असे प्रा. डॉ. स्वप्निल पोतदार यांनी सांगितले.

अन्याया विरोधात जस्टिस पॅनल: विद्यापीठाची भुमिका ही विद्यार्थी हिताची असावी. प्राध्यापकांचेही मानासिक खच्चीकरण होवू नये यासाठी आम्ही निवडणूकीच्या मैदानात उतरलो असषयाची भुमिका जास्टिस पॅनलचे प्रमुख प्रा. कमलाकर पायस यांनी 'ईटिव्ही भारत ' शी बोलताना व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा विकास व्हावा अशीच आमची भूमिका असल्याचे देखील कमलाकर पायात म्हणाले.

35 हजार 274 मतदार: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम अशा पाच जिल्ह्यातील एकूण 35 हजार 274 मतदार आहेत. पाचही जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्रांवर जाऊन मतदारांना मतदान करता येणार आहे. 22 नोव्हेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मतमोजणी केली जाणार असून त्याच दिवशी निकाल घोषित केले जाणार आहेत.

Last Updated : Nov 3, 2022, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.