अमरावती : अपंग समावेशित शिक्षण योजना ( Disability Inclusive Education Scheme ) माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक समायोजन या विषयासंदर्भात बैठक ( Meeting regarding teacher adjustment ) झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात सुनावणी सुरू असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. अतिशय बारकाईने तपास करून निर्णय घेतले गेलेत. समितीने अहवाल दिला आहे. थेट कारवाई केल्यापेक्षा प्रत्येकाची बाजू समजून घेणे महत्त्वाचे आहे. कुणाच्याही न्याय हक्कावर गदा आणणे हे यामध्ये अजिबात नाही. उलटपक्षी समितीकडून काही सुटले असेल तर ते समितीच्या निदर्शनास आणून देता येईल. यासंदर्भात सर्वांना योग्य तो न्याय देण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मनूकुमार श्रीवास्तव यांच्याशी भेट : विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान राज्याचे मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांच्याशी भेट झाल्यावर काही विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. ही आमची नियमित भेट असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु भेटीचा तपशील देण्यास त्यांनी नकार दिला. मी ज्याही वेळेस एखाद्या भागाचा दौरा करतो त्यावेळेस त्या भागातल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या समजून घेवून त्या राज्यव्यापी करुन इतर विभागांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतो हेच माझ्या दौऱ्याचं फलित असते अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधानी : क्षेत्रीय दौऱ्या दरम्यान काही ठिकाणी चांगल्या गोष्टी पण आढळतात आणि काही ठिकाणी कामामध्ये दोष आढळतात. परंतु एखाद्या ठिकाणी दोष का निर्माण झाले असतील तर ते का झाले आणि ते दोष निर्माण होऊ नये यासाठी काय उपाययोजना करावेत हे पण समजून घेतो.शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती येथे भेट दिली असता या ठिकाणची टपाल व्यवस्था तसेच कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.चांगल्या गोष्टी प्रशासनामध्ये कशा आणता येतील याकडे माझा विशेष कल असतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.