ETV Bharat / state

अमरावती कोविड रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांचे हाल, सुविधांचा अभाव

author img

By

Published : May 28, 2020, 10:17 AM IST

अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांची काळजी योग्य पद्धतीने घेण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते. असे असताना कोविड रूग्णालयात चक्क शौचालय आणि स्नानगृहात पाणीच येत नसल्याने रुग्णांना कोरोनासोबतच या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे.

no facilities at Covid Hospital
अमरावती कोविड रुग्णालय

अमरावती - कोरोनाची लागण झाल्यामुळे आधीच धास्तवलेल्या रुग्णांना अमरावतीच्या कोविड रुग्णालयात आंघोळीसाठी आणि शौचालयासाठी पाणीही नाही. यामुळे रुग्ण चांगलेच वैतागले आहेत. एकीकडे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाबाधितांना सोयी-सुविधाही मिळत नसल्याचे चित्र अमरावतीच्या कोविड रुग्णालयात पाहायला मिळत आहे.

अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्तांची काळजी योग्य पद्धतीने घेण्यात येईल, त्यांची सर्व व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते. असे असताना कोविड रुग्णालयात चक्क शौचालय आणि स्नानगृहात पाणीच येत नसल्याने रुग्णांना कोरोनासोबतच या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे.

रुग्णालयात वेळेवर चहा, नाश्ता आणि जेवणही मिळत नसल्याची तक्रार कोरोना रुग्णांकडून येत आहे. जेवणात केवळ एकच पोळी दिली जात असल्याने आमची याठिकाणी उपासमार होत असल्याचेही काही रुग्णांनी भ्रमणध्वनीद्वारे 'ई टीव्ही भारत'शी संपर्क साधून सांगितले. शौचालयात आणि स्नानगृहात पाणी नसल्यामुळे रुग्णांना चक्क बाहेरून मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत असल्याचा दुर्दैवी प्रकार या रुग्णालयात सुरू आहे. प्रशासनाने आम्हाला योग्य सुविधा पुरवावी किंवा आमच्या कुटुंबीयांना आमच्यासाठी व्यवस्था करण्यासाठी सूट द्यावी, अशी मागणीही रुग्णालयात दाखल काही कोरोनाग्रस्तांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.