ETV Bharat / state

Dinesh Suryawanshi: 'त्या' व्हायरल पोस्टशी माझा संबंध नाही - दिनेश सूर्यवंशी - दिनेश सूर्यवंशी

मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्राध्यापक संघटना (ncp professors association) मिळून विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या संवर्गात उमेदवार उभे करणार आहे, अशा पद्धतीची एक पोस्ट समाजमाध्यमात व्हायरल झाली असून, त्या पोस्टचा आणि त्यातील मजकुराशी आपला काही एक संबंध नसल्याची माहिती दिनेश सूर्यवंशी (Dinesh Suryawanshi) यांनी पत्रकार परिषदेत दिली

Dinesh Suryawanshi
Dinesh Suryawanshi
author img

By

Published : Nov 6, 2022, 4:13 PM IST

अमरावती: मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्राध्यापक संघटना (ncp professors association) मिळून विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या संवर्गात उमेदवार उभे करणार आहे, अशा पद्धतीची एक पोस्ट समाजमाध्यमात व्हायरल झाली असून, त्या पोस्टचा आणि त्यातील मजकुराशी आपला काही एक संबंध नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी सिनेट सदस्य दिनेश सूर्यवंशी (Dinesh Suryawanshi) यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस प्राध्यापक संघटना यांच्याशी माझा संबंध जोडून समाजामध्ये आणि जिल्ह्याच्या राजकारणात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

दिनेश सूर्यवंशी

विद्यापीठाशी माझा जवळचा संबंध: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होऊ घातल्या आहेत. गेल्या 40 वर्षापासून मी विद्यापीठाशी निगडित आहे. 1995 ला पहिल्यांदा सिनेट मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उमेदवार म्हणून निवडून आलो. त्यानंतर 2000 पुन्हा एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातून निवडणूक लढवून विजय झाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

प्रा. प्रदीप खेडकर यांना आपला विरोध: शिक्षण मंचाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप खेडकर वगळता इतर सर्व उमेदवारांचा प्रचार करेल. प्रदीप खेडकर हे दुतोंडी नेतृत्व आहे. त्यांच्यामुळे अनेक प्राध्यापकांचे नुकसान झाले आहे. या सीनेट निवडणुकीत पदवीधर संवर्गातून मतदारसंघातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना सक्रियपणे तन-मन धनाने पाठिंबा आहे. या सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांसाठी घरोघरी जाऊन संस्थांमध्ये जाऊन आणि समाज माध्यमातील इतर सर्व माध्यमातून प्रचार करणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.