ETV Bharat / state

Umesh Kolhe murder case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणी दोन आरोपी एनआयएच्या ताब्यात, लवकरच मुंबईत आणण्याची शक्यता

अमरावती येथे उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएने दोन आरोपींना ताब्यात घेतले ( NIA arrested two accused ) आहे. भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर समर्थन दर्शवल्याने उमेश कोल्हे यांची ( Umesh Kolhe Support Nupur Sharme )हत्या करण्यात आली होती. एनआयए लवकरच दोघांना अटक केल्यानंतर मुंबईत आणू शकते. आरोपींनी चाकून वार करून उमेश कोल्हे यांची हत्या केली ( Umesh Kolhe Murder )होती.

author img

By

Published : Aug 3, 2022, 1:23 PM IST

Updated : Aug 3, 2022, 2:17 PM IST

Umesh Kolhe murder case
उमेश कोल्हे हत्या प्रकरण

अमरावती - अमरावती येथे उमेश कोल्हे हत्या प्रकरणी एनआयएने दोन आरोपींना ताब्यात घेतले ( NIA arrested two accused ) आहे. भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला समर्थन दर्शवल्यानंतर उमेश कोल्हे यांची ( Umesh Kolhe Support Nupur Sharme )हत्या करण्यात आली होती. एनआयए लवकरच दोघांना अटक करून मुंबईत आणू शकते. आरोपींनी चाकूने वार करून उमेश कोल्हे यांची हत्या केली ( Umesh Kolhe Murder )होती.

मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य - भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याला अमरावतीतील उमेश कोल्हे यांनी सोशल मीडियावर समर्थन दर्शवले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाणला कारागृहातील इतर कैद्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकारही समोर आला होता. या आरोपींनी दुसऱ्या कारागृहामध्ये पाठवण्यात यावे याकरिता अर्ज केला होता. या अर्जाला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने आणि एनआयएनेदेखील सहमती दर्शवली होते.

काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले. त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली

हेही वाचा - Govind Pansare Murder Case : गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Last Updated : Aug 3, 2022, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.