अमरावती : राष्ट्रीय आरोग्य मिशनचे प्रभारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या निषेधार्थ, आज अमरावतीत (Amravati) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी (NCP workers publicly protested) आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांचा जाहीर निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यावेळी गदारोळ झाला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक : दौऱ्यावर असणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे शनिवारी दुपारी चार वाजता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार होते. या बैठकीसाठी ते सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचले. दरम्यान तानाजी सावंत यांचा निषेध नोंदवण्यासाठी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचले होते. आरोग्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, मंत्र्यांच्या वाहनासमोर जोरदार नारेबाची केली. यावेळी तुकाराम मुंडे यांच्या समर्थनात आणि राज्य शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फलक झळकवीत घोषणाबाजी देखील केली. दरम्यान मंत्री तुकाराम सावंत यांनी आंदोलन कर्त्यांना कुठलाही प्रतिसाद न देता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी महसूल भावनाकडे निघून गेले.
अपंग संघटना ही आक्रमक : अपंगांना योग्य न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध अपंग संघटना देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या प्रश्नांसंदर्भात आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर करायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे अपंग कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आरोग्य मंत्रांना यावेळी भेटता येऊ शकले नाही.