ETV Bharat / state

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; अमरावतीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

खरीप पिकांसाठी एकरी 20 हजार रुपये तर, संत्रा उत्पादकांना एकरी 40 हजार रुपये मदत देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी, सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकामांना रोजगार हमी योजनेत प्राधान्य देऊन शेतमजुरांना तत्काळ काम उपलब्ध करून देण्यात यावे यांसह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकूर यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना दिले.

author img

By

Published : Nov 21, 2019, 8:58 PM IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा विभागीय आयुक्तालयावर मोर्चा

अमरावती - ओल्या दुष्काळामुळे हतबल आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढला. यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह सुट्टीवर असल्याने अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना या महिलांनी निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकूर

खरीप पिकांसाठी एकरी 20 हजार रुपये तर, संत्रा उत्पादकांना एकरी 40 हजार रुपये मदत देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तत्काळ मिळावी, सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकामांना रोजगार हमी योजनेत प्राधान्य देऊन शेतमजुरांना तत्काळ काम उपलब्ध करून देण्यात यावे, आधारभूत विक्री शुल्कानुसार शेतमालाची खरेदी सुरू करण्यात यावी, शासकीय कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, शेतमजुरांच्या मुलांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करावे यांसह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकूर यांनी दिले.

हेही वाचा - काँग्रेसच्या माजी खासदाराचा परभणी महापौराला घरचा आहेर, खड्ड्यांवरून धरले धारेवर

यावेळी माजी मंत्री वसुधा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या डॉ. आशा मिरगे, अमरावती जिल्हाध्यक्षा संगीता ठाकरे, यवतमाळच्या जिल्हाध्यक्षा पद्मा अहिरकर, अकोला महानगर अध्यक्षा रिजवाना, वाशीमच्या सोनाली ठाकूर, अमरावतीच्या कार्याध्यक्ष सुषमा बर्वे यांच्यासह अमरावती पाचही जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Intro:ओल्या दुष्काळामुळे जेरीस आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश प्रभारी सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला.

Body:विभागीय आयुक्त पियुष सिंह सुट्टीवर असल्याने अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस निवेदन सादर केले. सोयाबीन,उडीद,मूग,ज्वारी, कापूस, तूर आदी खरीप पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना एकरी 20 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई म्हणून एकरी 40 हजार रुपये मदत देण्यात यावी पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी शेतीमधील कामांना रोजगार हमी योजनेमध्ये प्राधान्य देऊन शेतमजुरांना तात्काळ काम उपलब्ध करून देण्यात यावे. आधारभूत विक्री शुलकानुसार शेतमालाची खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी. अमरावती विभागात कापूस हे मुख्य पीक असल्यामुळे शासकीय दराने कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे. शेतकरी शेतमजुरांच्या मुलांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क त्वरित माफ करावे आगामी रब्बी हंगामाकरिता बी- बियाणे व खतांचा पुरवठा अनुदानावर तात्काळ सुरू करण्यात यावा. तसेच कायमस्वरूपी नुकसान झालेल्या फळबागांना पुनर्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय फळबाग योजना राबविण्याची मागणी यावेळी सुरेखा ठाकरे यांनी केली.
यावेळी सुरेखा ठाकरे यांच्यासह माजी मंत्री वसुधा देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. आशा मिरगे अमरावती जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष पद्मा अहिरकर ,अकोला महानगर अध्यक्ष रिजवाना, वाशीमच्या सोनाली ठाकूर, अमरावतीच्या कार्याध्यक्ष सुषमा बर्वे, मोशी तालुकाध्यक्ष वृषाली विघे, नीलिमा शिरभाते, प्रमिला बिजागरे, स्वाती बलींगे यांच्यासह अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा,वाशीम, यवतमाळ या पाचही जिल्ह्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.