अमरावती: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारपासून मेळघाट दौऱ्यावर आहेत. मेघाटातील काही दुर्गम गावात पोहोचण्यासाठी राणादांपत्या चक्क दुचाकीवर स्वार केला. तर मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरला आहे. सध्या राजकारणासह सर्वच प्रकारचे तणाव विसरून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या आदिवासी बांधवांशी एकरूप होऊन होळीचा सण एन्जॉय केला. ज्या ज्या गावात राणादांपत्य पोहोचत आहेत त्या सर्व गावांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. संपूर्ण मेळघाटात सध्या होळीच्या आनंदासोबतच राणा दाम्पत्याचा सहवास आदिवासी बांधव देखील एन्जॉय करत आहेत.
नवनीत राणांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका: होळीनिमित्त मेळघाटातील प्रत्येक गावात आदिवासी बांधव नृत्य सादर करून आनंद लुटत असताना, त्यांच्या गावात पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा यादेखील आदिवासी बांधवांसोबत नृत्यावर ठेका धारला आहे. काऊ गावी सुरू असणाऱ्या या नृत्य सोहळ्यात खासदार नवनीत राणा यांनी सहभागी होऊन आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवात नवा उत्साह निर्माण केला आहे.
खासदार राणांनी चुलीवर बनवला चहा: होळीनिमित्त मेळघाट दौऱ्यावर असणारे राणा दांपत्य अतिदुर्गम गावात पोहोचले. या गावात असणाऱ्या छोट्याशा हॉटेलमधील चुलीवर खासदार नवनीत राणा यांनी चहा बनवला. मातीच्या चुलीवर असणारी भट्टी त्यांनी स्वतः फिरवून चुलीवरचा चहा बनविण्याचा आनंद लुटला. या हॉटेलमध्ये चहा बनविणाऱ्या महिलेचा खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सत्कार देखील केला.
दाभिया गावात होळीचा जल्लोष: मेळघाटातील आणखी एक दुर्गम भागात वसलेल्या दाभिया या गावात खासदार नवनीत राणा यांनी गावातील महिला आणि चिमुकल्याण सोबत होळीचा आनंद लुटला. त्यांना होळीच्या आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दाभिया गावातच खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्यावर ठेका धरला तर आमदार रवी राणा यांनी यावेळी ढोल वाजवून नृत्य सोहळ्यात रंगत भरली.
हेही वाचा: Navneet Rana Dance आमदार रवी राणांच्या तालावर धरला नवनीत राणांनी ठेका