अमरावती - फेम इंडिया मासिक आणि एशिया पोस्टने भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ महिलांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा पहिल्या पाच महिलांमध्ये समावेश आहे. महिला सशक्तीकरण, सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, प्रतिमा, उद्देश, प्रयत्न अशा दहा निकषांचा वापर करुन ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे, नागपूर कारागृहाची माहिती
केंद्रात विविध मुद्यांवर उत्तम कामगिरी, अमरावतीसह राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नाची दखल घेतल्याने खासदार राणा यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. माझ्या कामाला आत्ताच सुरुवात झाली आहे. लोकांनी मला माझ्या कामामुळे ओळखावे, अशी माझी इच्छा आहे. मी लोकांच्या समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत राहील, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.