ETV Bharat / state

Navneet Rana  On Uddhav Thackery : 'जिथे जिथे उद्धव ठाकरेंची सभा, तिथे तिथे हनुमान चालीसा पठण होणार' - नवनीत राण यांना अश्रू अनावर झाले

हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेच्या ज्या ज्या ठिकाणी सभा होईल, त्या सर्व ठिकाणी हनुमान चालीसा पठण करु अशी घोषणाही त्यांनी केली.

Navneet Rana
खासदार नवनीत राणा झाल्या भावुक
author img

By

Published : Apr 6, 2023, 5:51 PM IST

Updated : Apr 6, 2023, 6:15 PM IST

खासदार नवनीत राणा झाल्या भावुक

अमरावती: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर प्रचंड अत्याचार केला. आमच्यावर झालेला अत्याचार आम्ही सहन करू शकतो. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे घरात गप्प बसून होते. आम्ही महाराष्ट्रावर आलेले संकट टाळावे यासाठी मुख्यमंत्र्यांना हनुमान चालीसा पठण करावे अशी विनंती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्ष ज्या हिंदुत्वासाठी लढा दिला त्या हिंदुत्वाला बाजूला सारले. उद्धव ठाकरे यांना स्वतःचे घर देखील सांभाळता येत नाही. त्यांना त्यांचे 40 आमदार सांभाळता आले नाही असा टोलाही नवनीत राणा यांनी लगावला. तसेच हिंदुत्वाचा विसर पडलेल्या उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभा होईल, त्या त्या सर्व ठिकाणी आम्ही हनुमान चालीसा पठण करत शुद्धीकरण करू असे देखील खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

व्यक्त केल्या भावणिक आठवणी : हनुमान जयंती निमित्त अमरावतीत आयोजित कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी कारागृहातील अनुभव सांगत. वातावरण हळवे बनवले त्या म्हणाल्या हनुमान चालीसा पठण केल्यामुळे थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आम्हाला 14 दिवस कारागृहात डांबण्यात आले. इतरांना चार वेळा पाणी दिले जायचे, मला मात्र एकच वेळा पाणी द्यायचे, वरून आदेश असल्याचे कर्मचारी सांगायचे. मला मानेचा त्रास झाला. रुग्णालयात दाखल करावे लागले. माझी लहान मुले मला त्यावेळी असे का असे प्रश्न विचारायची. अमरावतीत अकरा वेळा हनुमान चालीसा पठण केल्यानंतर त्यांनी हनुमान भक्तांशी संवाद साधकांना हनुमान चालीसा घटने मागील उद्देश स्पष्ट केला.

111 वेळा हनुमान चालीसा पठण: हनुमान चालीसा पठण केले म्हणून आमच्यावर थेट राजगृहाचा गुन्हा दाखल केला, याचे प्रचंड दुःख वेदना आज देखील होत आहे. आपल्यावर झालेला हा अन्याय आणि त्यासाठी 14 दिवस कारागृहात काढणे, हे माझ्या आयुष्यात सर्वात कठीण होते. कारागृहात असताना मी प्रत्येक दिवशी 111 वेळा हनुमान चालीसा पठण केले. त्याचवेळी मी कारागृहाच्या बाहेर निघाल्यावर अमरावती 111 फुटाची हनुमानाची भव्य मूर्ती उभारेल असा संकल्प केला होता.

माती एक वीट आणि एक रुपया द्या: शहरात 111 फुटांची भव्य हनुमान मूर्ती उभारली जात आहे. महाराष्ट्रातील जे लोक देवाला विसरले ज्यांना हिंदू धर्माचा विसर पडला अशांना देखील अमरावती शहरातील ही मूर्ती राज्यभर दिसावी असा माझा संकल्प आहे. हनुमानाची ही मूर्ती प्रत्येक अमरावतीकरांच्या मदतीने साकारायची आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणातील थोडीशी माती, एक वीट आणि एक रुपया द्यावा असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केले.

मूर्तीचे लोकार्पण: 111 फूट हनुमान मूर्तीचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. हनुमान गढिची माती भूमिपूजनाच्या दिवशी अमरावतीत आणली जाणार आहे. अयोध्येत ज्यावेळी श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण होईल त्यानंतर लगेच अमरावतीत या 111 फूट हनुमान मूर्तीचे लोकार्पण केले जाणार आहे. यावेळी अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा: Navneet Rana Hanuman Chalisa Pathan हनुमान चालिसा पठणानंतर खा नवनीत राणा यांची ठाकरेंवर टिका

Last Updated : Apr 6, 2023, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.