अमरावती - संचारबंदीच्या काळात मेळघाटातील मजूर आपल्या गावी येत आहेत. त्यामुळे मेळघाट परिसरातही आता कोरोनाचे संक्रमण वाढू नये, यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाटात दौरा सुरू केला आहे. यादरम्यान त्यांनी धारणी येथे पीपीई कीटचे वितरण करुन अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.
टाळेबंदीच्या काळात अनेक आदिवासी मजुरांना रोजगार नसल्याने त्यांना खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी जीवनावश्यक वस्तू दिल्या. यावेळी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे देखील उपस्थित होते.