अमरावती - राज्यात सध्या नवरात्राचा उत्सव सुरू आहे. मात्र, सर्वत्र देवीची मंदिरे बंद असल्याने महिलांना मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेता येत नाही. यावरूनच खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चूक दुरुस्त करण्याचा खोचल सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांना मंदिरालयच सुरू करायचे होते, परंतु ते मंदिरालयाच्या 'म' वरील अनुस्वार द्यायला विसरले आणि त्यांनी मदिरालय सुरू केले, अशी खोचक टीका खासदार राणा यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपली चूक दुरुस्त करावी आणि मंदिर तत्काळ सुरू करावीत, असा सल्ला खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे चूक दुरुस्त करा.. मंदिरालय शब्दावरील अनुस्वाराचा तुम्हाला विसर; खासदार नवनीत राणांचा सल्ला
राज्यातील मंदिरे सुरू करण्यावरून विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत, त्याच प्रमाणे भाजपने संसदीय समितीवर नियुक्ती केलेल्या खासदार नवनीत राणा यांनी देखील आता मंदिर उघडण्याच्या मागणीवरून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.