अमरावती Navneet Rana Kite : मकर संक्रांतीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित पतंग महोत्सवात भगवान रामाच्या नावाने पतंग उडवलाय. या पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा देखील सहभागी झाले होते. पतंग महोत्सवात बेलपुरा, गांधीनगर परिसरातील अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला होता.
श्रीरामाचा यावर्षी खऱ्या अर्थानं संपला वनवास : प्रभू श्रीरामानं 14 वर्षे वनवास भोगला होता. मात्र, यावर्षी 22 जानेवारीला अयोध्येत भगवान श्रीराम आयोध्येतील राम मंदिरात विराजमान होत आहे. त्यामुळं अनेक वर्षांचा श्रीरामाचा वनवास यंदा संपुष्टात येत आहे, असं खासदार नवनीत राणा महोत्सवात म्हणाल्या. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केलीय. मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण केल्यास उद्धव ठाकरेंचं संकट दूर होईल, असं देखील त्यांनी म्हटलंय.
चालीसाचं पठण केल्यास ठाकरे कुटुंबाचं संकट दूर : 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसाचं पठण केल्यास ठाकरे कुटुंबावरील संकट दूर होईल, मकर संक्रांतीनिमित्त मातोश्रीवर पतंग उडवून हनुमान चालिसाचा जप करण्याचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही आमदार रवी राणा यांनी सांगितलं.
चिमुकल्यांना पतंग आणि चक्रीचे वाटप : मकर संक्रांतीनिमित्त युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीनं आयोजित पतंग महोत्सवात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी लहान मुलांसह पतंग उडविण्याचा आनंद लुटला. तसंच त्यांनी स्पर्धकांना पतंग मांजासह साहित्याचं वाटप देखील केलं. तसंच पतंग महोत्सवानिमित्त नवनीत राणा तसंच आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -