अमरावती - खासदार नवनीत राणा या होळीनिमित्त आयोजित आदिवासी नृत्यात सहभागी झाल्या. (MP Navneet Rana Celebration) धारणी तालुक्यात येणाऱ्या विविध गावात आयोजित या सोहळ्यात सहभागी होऊन खासदार नावनीत राणा या आदिवासी बांधवांच्या पारंपारीक नृत्यात थिरकल्या. एका गावात आमदार रवी राणा यांनी ढोल वाजवला तर खासदार नवनीत राणा यांनी त्यावर चांगलाच ठेका धरला.
खासदार राणा हाॅलीबाॅलही खेळल्या
होळीच्या पर्वावर धारणी तालुक्यातील आदिवासीबहूल भागात दौऱ्यावर असताना खासदार नवनीत राणा आदिवासी युवकांसबोत हाॅलीबाॅल खेळन्याचा आनंदही त्यांनी घेतला.
मेळघाटात आठ दिवस होळी
मेळघाटातील आदिवासी बांधवांचा होळी हा सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण सलग आठ दिवस साजरा केला जातो. अनेक गावत होळीच्या दिवशी होळी पेटवली जाते तर काही गाबत रंगणचमीच्या दिवशी होळी पेटवतात. होळीची संपूर्ण रात्र नाच गाण्यात नाच गाण्याने साजरी केली जाते. होळीच्या पर्वावर मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांची वाहने अडवून त्यांना फगाव अर्थात पैसे मागण्याची प्रथा आहे.
हेही वाचा - Holi 2022 : लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणारी बॉलिवूड जोडपी