ETV Bharat / state

Babasaheb Ambedkar Jayanti: राणा दाम्पत्याने लगावला 'जय भीम'चा नारा, अमरावतीत इर्विन रुग्णालयाचे केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण - इर्विन रुग्णालय अमरावती

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पर्वावर अमरावती शहरातील इर्विन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री अभिवादन केले. 'जय भीम'चा नारा दिला. इर्विन अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्यात आले.

Irwin Hospital Naming
इर्विन हॉस्पिटलचे नामकरण
author img

By

Published : Apr 14, 2023, 9:46 AM IST

इर्विन हॉस्पिटलचे नामकरण

अमरावती : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह त्यांचे युवा स्वाभिमान संघटनेचे शेकडो कार्यकर्ते मध्यरात्री बारा वाजता इर्विन चौक येथे एकत्रित आले. यावेळी फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हातात निळा झेंडा घेऊन तो इर्विन चौकात फिरवला.

फटाक्यांची आकाशबाजी आणि फुलांचा वर्षाव : राणा दाम्पत्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेकडो अनुयायांनी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ. राजेंद्र गवई आणि अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष केला. तसेच 'जय भीम' असे नारे देखील लावले.

रुग्णालयाचे नामांतरण हा आनंदाचा क्षण : देशात इंग्रजांची राजवट असताना अमरावती शहरात स्थापन झालेल्या रुग्णालयाला 'इर्विन रुग्णालय' असे नाव होते. आता या देशातून इंग्रज 75 वर्षांपूर्वीच निघून गेले आहेत. या चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे. यामुळेच आता या इर्विन रुग्णालयाचे नामकरण आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय असे करीत आहोत. रुग्णालयाच्या नामांतरणाचा हात क्षण आमच्याकरिता अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी यावेळी दिली.

'हे' कार्यकर्ते उपस्थित : यावेळी युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, समाधान वानखडे, प्राध्यापक संतोष बनसोड, अश्विन उईके, अनुप खडसे, मनोज गजभिये, विलास वाडेकर, गणेशदास गायकवाड, साक्षी उमप, अविनाश काळे, धनंजय लोणारे, मंगेश चव्हाण, निखिल वावगे, राहुल काळे, शुभम उंबरकर, योगेश बनसोड, योगेश जयस्वाल, अविनाश तापडिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : Babasaheb Ambedkar Jayanti : शांतीवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति संग्रहालयात बाबासाहेबांच्या विविध वस्तुचे जतन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.