अमरावती - राज्याचे माजी कृषिमंत्री आणि नवनिर्वाचित राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे ( Rajya Sabha MP Dr. Anil Bonde ) यांची संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी ( Parliamentary Affairs Minister Prahlad Joshi ) यांनी पक्षाच्यावतीने प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. राज्यसभेत भाजप नेते म्हणून ज्येष्ठ मंत्री पियूष गोयल ( Piyush Goyal ) यांची पक्षाने यापूर्वीच नियुक्ती केली आहे. खासदार स डॉ. अनिल गुंडे यांच्यावर महाराष्ट्र, गोवा व राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.
दहा खासदारांची नियुक्ती जाहीर - राज्यसभा सचिवालयाने पक्षाच्या मुख्य व्हिपपदी उत्तर प्रदेशचे खासदार डॉ. लक्ष्मीकांत वाजपेयी यांची तर त्यांच्यासह अन्य दहा खासदारांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड डॉ. अशोक वाजपेयी, डॉ. अनिल अग्रवाल, श्री ब्रिजलाल, मध्य प्रदेश,छत्तीसगड करीता अजय प्रतापसिंह. ईशान्य कडील राज्याकरिता कामाख्या प्रसाद तासा, बिहार झारखंड समीर ओराण, हरियाणा, हिमाचल इंदू बाला गोस्वामी , दिल्ली गुजरात रमिलाबेन बारा, आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटका तामिळनाडू पांडिचेरी करीता जी. व्ही. एल. नरसिंग राव यांना या राज्याचे प्रतोदपदी जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वीच मुख्य व्हीप शिवप्रताप शुक्ला यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत जुलैमध्ये समाप्त झाली होती . त्यामुळे पक्षाने वरील नविन नियुक्त्या केल्या आहेत.