अमरावती - सुमारे दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका तेवीस वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता विषमिश्रीत दूध तिच्या एक वर्षाच्या बाळाने पिल्याने त्याचा मृत्य झाला होता. तालुक्यातील धनेगाव येथे शनिवारी (२२ फेबृवारी) ही हृदयद्रावक घडली होती. मात्र, या घटनेला आता वेगळे वळण मिळाले असून, रुग्णलयात उपचार चालू असलेल्या महिलेने, पती आणि सासूने आपणास जीवे मारण्याच्या उद्देशाने मला व बाळाला बळजबरीने विषारी औषध पाजल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा - सहा वर्षाच्या चिमुरडीचा अत्याचार करून खून, पीडितेच्या मैत्रिणीचा बापच निघाला आरोपी!
अमरावती येथे गेट लाईफ रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या प्रिया कुलदीप येवले (वय २३ रा. धनेगाव) असे या महिलेचे नाव आहे. तिने शुद्धीवर येताच पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. पती आणि सासूनेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने म्हटले आहे. घटनेच्या दिवशी प्रियाचा चुलत दीर अनिकेत येवले यांनी पोलिसांना प्रियाने विषारी औषध पिल्याची व बाळाने आईचे दूध पिल्यामुळे अकरा महिन्याचा बाळ कुंज त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. प्रियाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला अमरावती रुग्णालयात हलविण्यात आले होते. काल दिनांक २५ फेब्रुवारीला प्रिया शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आहे.
पीडित महिलेने पती व सासूचा त्रास असल्याचा आरोप केला आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी तिचा कुलदीप येवले यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला अकरा महिन्याचा कुंज नावाचा मुलगा होता. शेती हा व्यवसाय असताना संत्रा बागाची शेती असल्याने आर्थिक संपन्नताही परिवारात होता. पीडितेचा पती कुलदीप मधुकर येवले (वय-२७), सासू आशाबाई मधुकर येवले (वय-५५) यांच्याविरुद्ध ३०२, ३०७, ४९८ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी मात्र, फरार आहेत. पोलीस उपविभागीय अधिकारी सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल पोळकर यांनी सांगितले.
हेही वाचा - भिवंडीत 'तिहेरी तलाक'चा चौथा गुन्हा दाखल, हुंड्यासाठी दिला तलाक