अमरावती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या घरात साधारणता 150 लाख क्विंटल कापूस पडून आहे. कापसाला आता जास्त कालावधी झाल्याने खाज सुटली आहे. महाराष्ट्र शासनाने जे पत्र काढलं त्यामध्ये 20 तारखेपासून खरेदी करा परंतु अद्यापही कुठलीही कापसाची खरेदी करायची तयारी झाली नसल्याचा आरोप भाजपचे नेते माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
उलट पणन महासंघाच्या सचिवांनी एक पत्र काढून त्यात फक्त एफ एच यु दर्जाचा कापूस खरेदी करावा असे त्या पत्रात नमूद असल्याचा आरोप बोंडे यांनी केला. तो कापूस त्या दर्जाचा नसल्यास तो खासगी व्यापाऱ्यांकडे पाठवायचा का असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा कापूस कुठल्याही दर्जाचा असो तो शासनाने खरेदी करुन काढलेल पत्र मागे घ्यावे, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.