ETV Bharat / state

अमरावती शहर आणि जिल्ह्यात पुन्हा मान्सून सक्रिय; सर्वत्र मुसळधार पाऊस - RAIN IN AMRAVATI

अमरावती शहरात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांची जलाशय पातळी तुडूंब भरली आहे. अकरा पैकी आठ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस असताना तुलनेत अमरावती शहरात पावसाचे प्रमाण कमी आहे

अमरावतीत पाऊस
author img

By

Published : Sep 18, 2019, 9:30 AM IST

अमरावती- शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यावर्षी जिल्ह्यात बर्‍यापैकी पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांची जलाशय पातळी तुडूंब भरली आहे. तर अकरा पैकी आठ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून उर्वरित प्रकल्प भरण्याची शक्यता आहे.

अमरावतीत मान्सून पुन्हा सक्रिय

आज पहाटेपासूनच अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहर आणि परिसरात कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस कोसळत होता. मंगळवारी रात्रीपासून मात्र आकाशात ढग दाटून आले. आज पहाटेपासून अमरावती शहरात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस असताना त्या तुलनेत अमरावती शहरात पावसाचे प्रमाण कमी आहे. शहरातील छत्री तलाव आणि वडाळी तलाव अद्याप भरले नाहीत. असे असले तरी जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे अप्पर वर्धा धरण या वर्षी शंभर टक्के भरले आहे. या धरणाचे पाच दार उघडले आहेत. यासोबतच बेंबळा धरण 98.34% ,वान धरण 100 टक्के आणि पेनटाकळी धरण 97.10 टक्के भरले आहे. मोठ्या प्रकल्पांबरोबरच मध्‍यम प्रकल्‍पात उडणारे सापन धरण 96.26 टक्के भरले असून शहानुर धरण 95.30 टक्के, चंद्रभागा प्रकल्प 96.22 टक्के, पूर्णा प्रकल्प 92.5 टक्के, अधरपुस प्रकल्प 98.10 टक्के, नवरगाव आणि सायखेडा धरण 100 टक्के प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. आज पहाटेपासून पाऊस सुरू झाला असताना आकाश पूर्णतः काळ्या ढगांनी व्यापले आहे. आज दिवसभर अमरावती शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Intro:अमरावती शहर आणि जिल्ह्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे. यावर्षी जिल्ह्यात र्‍यापैकी पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांची जलाशय पातळी तूडुंब भरली आहे तर अकरा पैकी आठ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून उर्वरित प्रकल्प भरण्याची शक्यता आहे.

Body:आज पहाटेपासूनच अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहर आणि परिसरात अधून-मधून कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस कोसळत होता. मंगळवारी रात्रीपासून मात्र आकाशात ढग दाटून आले आज पहाटेपासून अमरावती शहरात जोरदार पाऊस बरसायला लागला. जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस असताना त्या तुलनेत अमरावती शहरात पावसाचे प्रमाण कमी आहे.शहरातील छत्री तलाव आणि वडाळी तलाव अद्याप भरले नाहीत असे असले तरी जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे अप्पर वर्धा धरण या वर्षी शंभर टक्के भरले आहे या धरणाचे पाच दार उघडले आहेत यासोबतच बेंबळा धरण 98. 34% ,वान धरण 100 टक्के आणि पेनटाकळी धरण 97 .10 टक्के भरले आहे. मोठ्या प्रकल्पात सोबतच मध्‍यम प्रकल्‍पात उडणारे सापन धरण 96. 26 टक्के भरले असून शहानुर धरण 95. 30 टक्के, चंद्रभागा प्रकल्प 96.22 टक्के पूर्णा प्रकल्प 92.5 टक्के , अधरपुस प्रकल्प 98.10 टक्के, नवरगाव आणि सायखेडा धरण 100 टक्के प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
आज पहाटेपासून पाऊस सुरू झाला असताना आकाश पूर्णतः काळे ढगांनी व्यापले आहे. आज दिवसभर अमरावती शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस बसण्याची शक्यता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.