ETV Bharat / state

Amravati Crime News: अमरावतीत 58 वर्षीय व्यक्तीची मजनुगिरी, मुलांना म्हणाला मला तुमची आई पसंत आहे; विनयभंगाचा गुन्हा दाखल - old person prapose children for their mother

दिवसेंदिवस रोड रोमियोंचे प्रमाणही वाढत चालले आहे. अमरावतीत चक्क एका 58 वर्षाच्या व्यक्तीने एका महिलेच्या मुलामुलीला रस्त्यात अडवून ‘मला तुमची आई पसंत आहे’, असे म्हटले आहे. या वक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati Crime News
विनयभंगाचा गुन्हा
author img

By

Published : Jun 16, 2023, 1:46 PM IST

अमरावती : रस्त्याने जात असणाऱ्या बहीण भावांना अडवून एका 58 वर्षीय व्यक्तीने त्यांना थेट मला तुमची आई पसंत आहे, असे म्हटल्यामुळे दोन्ही मुले हादरले. मुलांनी हा प्रकार त्यांच्या आईला सांगितल्यावर या कुटुंबाने थेट पोलीस स्टेशन गाठून संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार दिली. ही घटना १२ जून रोजी घडली. लक्ष्मण खियानी असे या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात महिलेने दिलेला तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी लक्ष्मण खियानी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. लक्ष्मण खियानी या व्यक्तीचा प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

'असे' आहे प्रकरण : गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला बाजारात भाजी आणण्यासाठी गेली असताना लक्ष्मण खियानी हा 58 वर्षीय व्यक्ती तिच्याकडे सतत पहात होता. त्याला घाबरून ती घरी परतत असताना त्याने तिचा घरापर्यंत पाठलाग केला. बऱ्याच वेळापर्यंत तो तिच्या घरासमोर उभा होता. त्याच्या या वागण्याबाबत महिलेच्या शेजारच्या व्यक्तींनी त्याला टोकले असता या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर माझी गर्लफ्रेंड राहते, असे तो परिसरातील व्यक्तींना म्हणाला.

गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार : गंभीर बाब म्हणजे त्याच दिवशी रात्री बारा वाजता देखील तो महिलेच्या घरासमोर बराच वेळ उभा होता. दुसऱ्या दिवशी महिलेचा मुलगा आणि मुलगी कामानिमित्त सकाळी साडेदहा वाजता बाहेर निघाले होते. तेव्हा त्या दोघांनाही लक्ष्मण खयानी याने दोन्ही मुलांना रस्त्यात अडवून मला तुमची आई पसंत आहे, असे म्हटले. या प्रकारामुळे हादरलेल्या मुलांनी घरी परत येऊन आईला झाल्या प्रकाराची माहिती दिल्यावर सदर महिलेने याबाबत गाडगे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा :

  1. Student Teases Lady Teacher : शिक्षिकेला 'आय लव्ह यू मेरी जान...' म्हणत बारावीच्या विद्यार्थ्याने छेडले; गुन्हा दाखल
  2. Cut The Woman's Nose: विनयभंगाचा गुन्हा मागे न घेतल्याने शाहजहांपूरमध्ये तरुणाने महिलेचे नाक कापले
  3. Sheetal Mhatre News: पप्पी दे पप्पी दे पारूला, शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांचा कथित व्हिडीओ व्हायरल; दोन जणांना घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.