ETV Bharat / state

अमरावती अट्टल मोबाईल चोराला अटक; 3 लाख 43 हजार रुपयांचे मोबाईल जप्त - पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके

अमरावती गाडगेनगर पोलिसांनी मोबाईल चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून 3 लाख 43 हजार रुपयांचे मोबाईल तसेच एक दुचाकी जप्त केली.

अमरावती मोबाईल चोराला अटक
अमरावती मोबाईल चोराला अटक
author img

By

Published : Dec 6, 2020, 11:02 PM IST

अमरावती - अमरावती शहरात विविध भागात लोकांच्या घरात शिरून मोबाईल फोनची चोरी करणारा अट्टल चोरटा गाडगेनगर पोलिसांनी पकडला आहे. त्याने विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या मोबाईलची किंमत 3 लाख 43 हजार रुपये असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

भाड्याच्या खोलीत लपविला माल-

वैभव नारायण आडोळे असे चोरट्याचे नाव असून तो मोर्शी तालुक्यातील येरला गावातील आहे. अमरावती शहरात बापटवडी परिसरात त्याने भाड्याची खोली घेतली होती. तिथे तो चोरी केलेले मोबाईल ठेवत होता. तसेच नागपूर येथून त्याने 60 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरली होती. ती सुद्धा गडगेनागर पोलिसांनी रविवारी जप्त केली.

गाडगेनागर पोलिसांनी केली कारवाई-

घरात घुसून मोबाईल चोरणाऱ्या वैभव आडोळेचा शोध गत काही दिवसांपासून पोलीस घेत होते. सूत्रांनी त्यांच्याबाबत माहिती देताच पोलीस आयुक्त आरती सिंह आणि पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनत गाडगे नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेर्तृत्वत डी.बी. पथकाचे महेश इंगोले, शेखर गेडाम, सुभाष पाटील, सतीश देशमुख, विशाल वाकपंजार, रोशन वऱ्हाडे यांनी वैभव आडोळेचा बापट वाडी येथील खोलीवर छापा टाकला.

हेही वाचा- शेतकरी आंदोलन : भारत बंदला आप, काँग्रेस, टीआरएससह द्रमुकचाही पाठिंबा

हेही वाचा- मुलीच्या संगोपनासाठी पत्नीकडूनच पैशाची मागणी; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.