ETV Bharat / state

'काँग्रेसने ज्यांना सर्वोच्च पद दिले, त्यांच्याच घरातून काँग्रेसविरोधात षडयंत्र' - व्हायरल

आमदार ठाकुर यांचा पराभव कसा करता येईल, यासाठी 5 कोटी रुपयांची व्यवस्था लावण्यासह इतर समिकरणांवर झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार यशोमती ठाकूर
author img

By

Published : Apr 25, 2019, 6:04 PM IST

अमरावती - काँग्रेसने ज्यांना या देशातील सर्वोच्च पदाची संधी दिली, आज त्यांच्याच घरातून काँग्रेस विरोधात षडयंत्र रचले जात आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाकूर यांनी, ही प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार यशोमती ठाकूर

आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार ठाकूर यांचा पराभव कसा करता येईल, यासाठी 5 कोटी रुपयांची व्यवस्था लावण्यासह इतर समिकरणांवर झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिमुळे खळबळ उडाली असताना शेखावत आणि सुर्यवंशी यांनी केलेला खुलासा हास्यास्पद आहे. ऑडिओ क्लिपमध्ये येणारा आवाज माझा नाहीच, असा दावा रावसाहेब शेखावत यांनी केला आहे. प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी क्लिपमधला आवाज माझा आहे, मात्र मी हे सारे कोणाशी बोललो माहिती नाही, असे विचित्र स्पष्टीकरण दिले आहे.

या प्रकरणाबाबत आज आमदार यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना आता निवडणुकीचा माहोल आहे. विधानसभा निवडणूकही जवळच आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत माझ्याविरुद्ध असेच षडयंत्र रचले गेले होते. आम्ही लढवय्या असल्याने आम्ही त्यावर मात केली. आता चक्क ज्यांना काँग्रेसने देशाचे सर्वोच्च पद दिले त्या घरातूनच काँग्रेसविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मला पराभूत करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा विषय त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. आज आम्हाला पाच, पन्नास लाख रुपये कसे जमा करायचे याचा प्रश्न पडतो. यांच्याकडे 5 कोटी कसे काय येतात, याची प्रशासनाने सुमोटो चौकशी करायला हवी, असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या.

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांच्याबाबत बोलताना आमदार ठाकूर म्हणाल्या ऑडिओ क्लिपमध्ये तेच काही बोलत असल्याचे ऐकू येत आहे. त्यातून त्यांची मानसिकता कळते. ते एका समाजाचा उल्लेख करीत आहेत. यावरून त्यांची विचारधारा लक्षात येते. आम्हाला केवळ जनतेचे प्रश्न कळतात. आजही पाणी टंचाईसारखे विषय मार्गी लागावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यासाठी आम्ही जात आहोत. बाकी हा सारा प्रकार हास्यास्पद असाच आहे, असेही आमदार यशोमती ठाकूर म्हणल्या.

Intro:काँग्रेस पक्षाने ज्यांना या देशातील सर्वोच्च पदाची संधी दिली, मान दिला आज त्यांच्याच घरातून काँग्रेसला कमी करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे अशी जळजळीत प्रतिक्रिया तीवस्याच्या आमदार आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर दिली आहे.

Body:काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांच्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार ठाकूर यांचा पराभव कसा करता येईल यासाठी ५ कोटी रुपयांची व्यवस्था लावण्यासह इतर समिकरणांवर झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या क्लिमुळे खळबळ उडाली असताना शेखावत आणि सुर्यवंशी यांनी केलेला खुलासा हास्यास्पद आह. ऑडिओ कॅलिपमध्ये स्पष्टपणे येणार आवाज माझा नाहीच असा दावा रावसाहेब शेखावत यांनी केला असताना प्राध्याप असणाऱ्या दिनेश सुर्यवंशी यांनी क्लिप मधला आवाज माझा आहे मात्र मी हे सारं कोणाशी बोललो माहिती नाही असे विचित्र स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रकरणाबाबत आज आमदार यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना आता निवडणुकीचा माहोल आहे. विधानसभा निवडणूकही जवळच आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत माझ्याविरुद्ध असेच षडयंत्र रचले गेले होते. आम्ही लढवय्या असल्याने आम्ही त्यावर मात केली. आता चक्क ज्यांना कंग्रेसने देशाचे सर्वोच्च पद दिले त्या घरातूंच कॉंग्रेसविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मला पराभूत करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा विषय त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. आज आम्हाला पाच, पन्नास लाख रुपये कसे जमा करायचे यासाठी प्रश्न पडतो यांच्याकडे ५ कोटी कसे काय येतात याची प्रशासनाने सुमोटो चौकशी करायला हवी असे आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा दिनेश सुर्यवंशी यांच्याबाबत बोलताना आमदार ठकार म्हणल्या ऑडिओ कॅलिपमध्ये तेज काही बोलत असल्याचे ऐकू येत आहे त्यातून त् यांची मानसिकता कळते. ते एका समाजाचा उल्लेख करीत आहेत यावरून त्यांची विचारधारा लक्षात येते. आम्हाला केवळ जनतेचे प्रश्न कळतात. आजही पाणी टंचाई सारखे विषय मार्गी लागावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यासाठी आम्ही जात आहोत. बाकी हा सारा प्रकार हास्यास्पद असाच आहे असे आमदार यशोमती ठाकूर म्हणल्यात.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.