अमरावती : सत्ता सोडणे एवढे सोपे नसते. सत्तेची लालसा अतिशय बेकार आहे. हे गत वर्षभरात आपण सगळे पाहत आहोत. मात्र माझीच माणसं माझ्यासोबत राहिली नाहीत, हा विचार करून मी सत्तेवर राहून काय करू? असा विचार करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांचा फेरविचार केला असता असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे होते. असे जरी सारे असले तरी महाराष्ट्राला नैतिकतेची मोठी झालर आहे. यामुळेच ही नैतिकता कायम राहावी. देशाचे संविधान हरणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमरावतीत केले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर ज्या काही घटना घडल्या, त्या सर्व बेकायदेशीरच होत्या. या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्रात कुठे नैतिकता राहिली का?- जितेंद्र आव्हाड
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद घटनाबाह्य : सभागृहात विप काढण्याचा अधिकार हा राजकीय पक्षाला आहे. एखादा पक्ष फुटून कुठला गट तयार होत असेल तर अशा गटाने काढलेला कुठल्याही विभा अधिकृत होऊच शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. मात्र सभागृहात व्हिपच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या. सभागृहात विश्वासाचा ठराव पारित केल्यावर अध्यक्षाची निवडणूक लावण्यात आली. शिवसेनेची बंड करणाऱ्या चाळीस जणांनी विप तोडला आणि नार्वेकरांना तिथे आणून बसवले. अधिकार नसताना नार्वेकरांनी काही गोष्टी केल्या. खरंतर नार्वेकर तिथे निवडून आले हीच चूक आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री सभागृहाचे प्रमुख असतात त्यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाचा गटनेता निवडला.
राजकीय पक्षांनी घेतलेल्या निर्णयाला महत्त्व : बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली. उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या गटनेते पदाला दिलेली मान्यता ही अधिकृत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे एकनाथ शिंदे यांची निवड अनाधिकृत आहे. आता गटनेता निवडण्याचा जो काही निर्णय झाला तो कायद्याच्या विरोधात असल्याचे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कायद्यानुसार राजकीय पक्षांनी घेतलेल्या निर्णयालाच महत्त्व आहे.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती : 1960 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री अंतुले यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांनी संध्याकाळी राजीनामा दिला. निलंगेकर यांच्या मुलीच्या परीक्षेतील गुणांचा निकाल आला आणि निलंगेकर यांनी संध्याकाळी राजीनामा दिला. मनोहर जोशींच्या जावयांवर आरोप झाले आणि त्यांनी देखील संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विलासराव देशमुख राम गोपाल वर्माला घेऊन ताज हॉटेलमध्ये गेले. यामुळे लोकांमध्ये दुराग्रह निर्माण झाला आणि विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला. आर आर पाटील बोलताना थोडेसे चुकले लोकांनी ते प्रकरण डोक्यावर घेतले, आणि आर आर पाटील यांनी लगेच राजीनामा दिला. महाराष्ट्रात अशी वेगळी संस्कृती राजकारणात होती. आताच्या संस्कृतीत काय आहे? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
जातीय दंगली घडवण्यावर भाजपचा भर : भाजप आता अनेक नवीन स्टोरी काढत आहेत. भाजपचा सर्वात जास्त भर हा जातीय दंगलींवर आहे. धर्म विद्वेष आणि जात विद्वेष याच्याशिवाय आता आपल्याला यश मिळणार नाही, हे भाजपला लक्षात आले असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. सध्या संपूर्ण देशात वाढलेली महागाई अनेक समस्या याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याबाबतची खंत देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
लोकांच्या शांततेचा अर्थ : आज भारतातील एक राज्य मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची आठवण होते. त्रिपुरा राज्य भारतात समाविष्ट करण्यासाठी इंदिरा गांधींनी पुढाकार घेतला असताना त्यांच्यावर अमेरिकेतून दबाव होता. मात्र थेट अमेरिकेत जाऊन त्रिपुराबाबत आम्ही घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, असे उत्तर देण्याचे धाडस इंदिरा गांधींमध्ये होते. आज मनिपुरमध्ये दोन जातींमधील हिंसाचार आटोक्यात आणण्याची जबाबदारी केंद्र शासनावर असताना हा हिंसाचार आटोक्यात येत नाही हे दुर्दैव आहे. आपल्या देशातील एका राज्यात प्रचंड हिंसाचार उफायला असताना देशातील लोक शांत आहेत. ही शांतता ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वीची शांतता आहे की देशातील लोकसंद झाले आहेत म्हणून शांतता आहे. हे कळायला मार्ग नसून लोकांच्या शांततेचा नेमका अर्थ काय? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.
देशात अध्यक्षीय प्रणाली आणण्याचा डाव : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. राज्यात ज्याप्रमाणे गडचिरोलीपासून कोकणापर्यंतच्या व्यक्तीला विधानसभेत निवडून येण्याचे स्वतंत्र आहे. तसेच देशाच्या संसदेत काश्मीरपासून दक्षिणेतील व्यक्तींनाही निवडून येण्याचा अधिकार आहे. जगातील सर्व महत्वाच्या देशाच्या संविधानाचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेत संसदीय प्रणालीला महत्व दिले आहे. आता मात्र या प्रणालीला छेद देत अध्यक्षीय प्रणाली आणण्याचा डाव आहे. यामुळे हा असा डाव हाणून पाडण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जागृत राहण्याची आणि संविधान वाचवण्याची गरज आहे, असे देखील आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आदीपुरुष सिनेमावर टीका : कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'बजरंग बली की जय' अशी घोषणा दिली. मात्र, बजरंग बली हे सत्यासोबत राहणारे असल्यामुळे कर्नाटकात भाजपचा पराभव झाला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आता आदीपुरुष हा सिनेमा देशभर प्रदर्शित झाला. या चित्रपटात हनुमानाच्या मुखात असणारे संवाद अतिशय चुकीचे आहेत. या सिनेमाची निर्मिती दुसऱ्या कोणी केली असती तर अमरावतीत बोंडांना आगी लागल्या असत्या. मात्र हा चित्रपट त्यांनी तयार केला असल्यामुळे सारे काही चुपचाप आहे. आम्ही डायलॉग बदलले म्हणतात ही काय मस्करी आहे का? भगवान श्रीरामाचे सर्वात पहिले चित्र हे पंडित रविवर्मा यांनी तयार केले होते. त्या चित्रात राम हा निळवणीय आणि शांत चित्ताचा दाखवला आहे. त्या श्रीरामाच्या चित्रामध्ये श्रीराम आणि हनुमानामध्ये एकमेकांप्रती प्रचंड निष्ठा दिसते. या आदीपुरुष चित्रपटात क्रुरता, राग असे चुकीचे मांडण्यात आले आहे. भगवान श्रीरामाने कधीही मर्यादा सोडली नाही. रावणाचा वध केल्यावर श्रीराम लक्ष्मणाला अयोध्येचा राजा सहज बनवू शकले असते, मात्र त्यांनी असा प्रकार न करता रावणाचा भाऊ विभीषणाला बँकेचा राजा बनवले. राम हे खऱ्या अर्थाने पुरुषोत्तम होते मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून रामायणाचा विपर्यास केला असल्याची टीका देखील जितेंद्र आव्हाड यांनी केली.
हेही वाचा :
- Awhad Criticized CM : सत्ता मिळाली नसती तर आत्महत्या केली असती असे म्हणणे म्हणजे लोकशाहीचा पराभव - जितेंद्र आवाड
- Jitendra Awhad : ४०० धर्मांतर झाल्याचे सिद्ध न केल्यास 1 जुलैला मुंब्रा बंद - जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
- Sindhi Community On MLA Awhad: तर नार्को टेस्ट करून जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करा...