अमरावती : आम्ही समाजकार्यातून घडलो आहोत, रक्तदान करणे हा आमचा पिंड आहे. मात्र आमच्या आड कोणी येत असेल तर, तलवार काढायलाही आम्ही मागेपुढे पाहत नाही. मात्र आम्हाला कोणाशीही वाद घालायचा नाही, कोणत्याही जाती धर्मासाठी आरक्षण मागायचे नाही. तर गरिबांनी अनाथांच्या वेदना जाणून घेऊन त्यांना जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य आम्हाला करायचे आहे. सत्ता गेली चुलीत, आमचे सेवेचे व्रत असल्याचे (MLA Bachu Kadu expressed his views) आमदार बच्चू कडू यांनी आज अमरावती नेहरू मैदान येथे आयोजित (Amravati Nehru Maidan today) प्रहार पक्षाच्या शक्ती प्रदर्शनाप्रसंगी (Prahar Party power demonstration organized) स्पष्ट केले. MLA Bachchu Kadu
चार पावलं मागे येण्याची तयारी : आमदार रवी राणा यांनी आम्हाला कारण नसताना आव्हान दिले होते. आता त्यांनी आमची माफी मागत एक पाऊल मागे घेत असल्याची भूमिका जाहीर केली. आमदार राणांनी माफी मागितली हे बरं झालं, अन्यथा आम्हाला आमची ऊर्जा विनाकारण आज खर्च करावी लागली असती. गरिबांचा भलं व्हावं यासाठी कोणी एक पाऊल मागे येत असलं, तर आम्ही दोन नव्हे तर चार पावलं मागे येण्याची तयारी दाखवतो असे, आमदार बच्चू कडू म्हणाले.
तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते : गत आठ दिवसांपासून टीव्हीवर आमचे थोबाड झळकत आहे. आमचं थोबाड असं टीव्हीवर झळकनं मला तरी योग्य वाटत नाही. विनाकारांच्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी देणाऱ्या प्रसारमाध्यमांनी जर शेतकऱ्यांसाठी मी केलेल्या आंदोलनाला महत्त्व दिले असते; तर आज राज्यातील शेतकऱ्यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले असते, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
समाजकार्यासाठी सत्ता महत्त्वाची : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसचे विचार कधीही पटले नाही. असे असले तरी आपल्या गोरगरीब समाजाचा उद्धार हा काँग्रेस सोबत जाऊनच होईल याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस सोबत सत्तेवर आल्यावर संविधानाच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला. मी कधी 20 वर्षांपासून साडेतीनशे गुन्हे अंगावर घेऊन राज्यातील अपंग आणि निराधारांसाठी आंदोलन करतो आहे. मला जर मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर, या गोरगरीब अनाथ आणि अपंगांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद निर्माण करण्याचे कार्य माझ्या हातून झाले असते असे बच्चू कडू म्हणाले.
भविष्यात मुख्यमंत्री आम्ही ठरवू : आज या मंचावर दोन आमदार आहेत, मात्र येणाऱ्या काळात या मंचावर दहा आमदार दिसतील. भविष्यात राज्यात मुख्यमंत्री कोण असावा, हे प्रहार जनशक्ती पक्ष ठरवेल असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला. MLA Bachchu Kadu