ETV Bharat / state

मोझरीत मंत्री यशोमती ठाकुरांची सत्ता कायम; मात्र जागा घटल्या

author img

By

Published : Jan 19, 2021, 3:15 PM IST

Updated : Jan 19, 2021, 4:42 PM IST

या निवडणुकीत ग्रामपंचायत सर्वाधिक लक्ष हे मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकीत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनलने 13 पैकी 7 जागांवर विजय मिळवून वर्चस्व कायम राखले आहेत.

minister-yashomati-thakur-retains-her-power-in-gurukunj-mozari
गुरुकुंज मोझरीत मंत्री यशोमती ठाकुरांची सत्ता कायम; मात्र जागा घटल्या

अमरावती - सोमवारी अमरावती जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष हे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकीत मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनलने 13 पैकी 7 जागांवर विजय मिळवून वर्चस्व कायम राखले आहेत. तर कम्युनिस्ट पक्षाच्या जनशक्ती पॅनलने 2 व 4 जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.

प्रतिनिधीचा रिपोर्ट

मागील निवडणुकीच्या तुलनेत 2 जागा कमी -

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनल ने 13 पैकी 9 जागांवर विजय मिळवला होता. परंतु यंदा मात्र या पॅनलला 9 जागांवरून 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 2 जागा कमी झाल्या आहेत. मागच्या निवडणुकीला यशोमती ठाकूर या आमदार होत्या. यंदा मात्र त्या राज्याच्या मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्याने व गावातील विकासकामे बघता, या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचे ९ किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य निवडणूक येतील, असा कयास येथील बांधण्यात आला होता. परंतु मागच्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या दोन जागा घटल्या आहेत.

विजयी झालेले उमेदवार -

ग्रामविकास पॅनलचे सरला ढवळे या वार्ड नंबर 1 मधून विजयी झाल्या आहेत. तर वार्ड नंबर 2 मधून गणेश गायकवाड, मोनिका मते, वार्ड नंबर 3 मधून गजानन तडस, प्रशांत प्रधान, वार्ड नंबर 4 मधून मालती गहूकर, वार्ड नंबर 5 मधून रंजना कांडलकर या विजयी झाल्या आहेत. तर वार्ड नंबर 1 मधून सुरेंद्र भिवगडे तसेच डिंपल सपाटे आणि वार्ड नंबर 4 मधून संजय लांडे व शुभांगी गहूकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. तसेच वार्ड 5 मधून जनशक्ती पॅनलचे मनोज लांजेवार व आरती निमकर यांचा विजय झाला आहे.

काँग्रेसला फटका -

वार्ड नंबर 2 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लढा संघटनेचे उमेदवार हे विजयी होण्याची परंपरा आहे. परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला असून तेथे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे. तर दुसरीकडे वार्ड नंबर 4 मध्ये ग्रामविकास पॅनलचा हा मागील वर्षी तीनही जागांवर विजय झाला होता.परंतु या निवडणुकीत तेथील मतदारांनी दोन अपक्ष उमेदवारांना कौल दिला असून ग्रामविकास पॅनलचा एकच उमेदवार विजयी झाला आहे.

विजयी उमेदवाराना मिळालेली मते -

सरला ढवळे - 408 मते
सुरेंद्र भिवगडे -195 मते
डिंपल सपाटे - 363 मते
गणेश गायकवाड-218 मते
मोनिका मते - 235 मते
गजानन तडस - 253 मते
प्रशांत प्रधान - 266 मते
संजय लांडे - 198 मते
मालती गहुकर - 293 मते
शुभांगी गहुकर - 363 मते
मनोज लांजेवार - 199 मते
रंजना कांडलकर -331 मते
आरती निमकर - 313 मते

हेही वाचा - ना गुलाल...ना मिरवणूक, स्वच्छता मोहीम राबवत साजरा केला विजयाचा आनंद!

Last Updated : Jan 19, 2021, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.