अमरावती - पोलंड येथे नुकतीच जागतिक तिरंदाजी स्पर्धा पार पडली आहे. जागतिक स्तरावरिल या स्पर्धेत अमरावतीच्या मुलीने दमदार कामगिरी केली. अशा गुणवंत खेळाडूंचा गौरव महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरची मंजिरी मनोज अलोणे हिने पोलंड येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भाग घेतला होता. मंजिरीने या स्पर्धेत आपली छाप सोडत कास्य पदक जिंकलं. तिच्या या यशाचे कौतुक मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. यावेळी मंजिरीसह आंतरराष्ट्रीय खेळाडू साक्षी तोटे, एकलव्य गुरुकुलचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, भारतीय संघाचे प्रशिक्षक अमर जाधव व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सदानंद जाधव गुरुजी यांनाही गौरविण्यात आले.
हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडूंनी अपंग बहिणींसोबत साजरा केले रक्षाबंधन
हेही वाचा - अचलपूर मधील फिनले गिरणी कामगारांचे शोले स्टाईल आंदोलन, बॉयलरच्या चिमणीवर चढून वेधले लक्ष