अमरावती - राज्यपालांनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहल ते अतिशय दुर्दैवी आहे. ते संविधानिक पदावर आहेत. पण, त्यांचे हे वागणे असंविधानिक आहे, अशा शब्दात महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली.
जर कोरोनाची भीती नव्हती तर राम मंदिराच्या पूजनवेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आडवाणी यांना का बोलवले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळ सुरू केल्यास कोरोना पसरणार नसेल तर त्याची जबाबदारी राज्यपालांनी घ्यावी.
राज्यपालांचे वागणे असंविधानिक असून यावर सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपतींनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा - गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांच्या समाधी समोर भाजपचे आंदोलन, मंदिरे उघडण्याची मागणी