ETV Bharat / state

मंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटाचा केला दौरा: एका तरुणीकडून विकत घेतला भाजीपाला - girl Melghat Vegetable Yashomati Thakur

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या मेळघाटाच्या पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी चित्री गावाजवळ एका शेतकरी तरुणीकडून भाजी विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

girl Melghat Vegetable Yashomati Thakur
तरुणी मेळघाट भाजीपाला यशोमती ठाकूर
author img

By

Published : Apr 20, 2021, 3:45 PM IST

Updated : Apr 20, 2021, 5:16 PM IST

अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या मेळघाटाच्या पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी चित्री गावाजवळ एका शेतकरी तरुणीकडून भाजी विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. दौऱ्या दरम्यान 'विकेल ते पिकेल' या योजनेंतर्गत एक तरुणी भाजीपाला विकत होती. मेळघाट सारख्या दुर्गम भागात या योजनेचे यशस्वी उदाहरण पाहून आपल्याला समाधान वाटल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा - चिखलदरा येथे 70 हजारांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त; दोघांना अटक

पालकमंत्र्यांनी घेतला मेळघाटातील विकासकामांचा आढावा

मेळघाटातील दुर्गम गावात पेयजलाच्या उपलब्धतेसाठी जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी, तसेच आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामात कुठलीही कुचराई न करता नागरिकांना परिपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा केला

पालकमंत्री ठाकूर यांनी मेळघाटातील दुर्गम गावांत सलग दोन दिवस गोपनीय दौरा करून तेथील विकासकामांचा व सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गावोगावच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे आदेश प्रशासनाला दिले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-

'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा

अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव

साताऱ्यातील यवतेश्वर घाटात उडी घेऊन १६ वर्षीय युवतीची आत्महत्या, आधारकार्डवरुन पटली ओळख

लॉजमधील हाय-प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, ८ तरुणींसह १० जणांना अटक

नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला

हेही वाचा - फ्रेजरपुरा पोलिसांनी नष्ट केली 70 हजारांची अवैध दारू

Last Updated : Apr 20, 2021, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.