ETV Bharat / state

'नव्या अविष्कारासह चांगली मुल्येही नव्या पिढीत रुजवणे गरजेचे'

author img

By

Published : Feb 9, 2020, 10:07 AM IST

नव्या पिढीमध्ये नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

उद्घाटन करताना मंत्री यशोमती ठाकूर
उद्घाटन करताना मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती - इंस्पायर्ड अवार्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास होतो. आज इंस्पायर्ड भारत घडवायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नव्या अविष्काराबरोबरच चांगली मुल्येही नव्या पिढीत रुजवणे गरेजेचे आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी ( दि. 9 फेब्रुवारी) यशोमती ठाकूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मार्गदर्शन केले.

नव्या अविष्कारासह चांगली मुल्येही नव्या पिढीत रुजवणे गरजेचे

शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित नव्या राज्यस्तरीय इंस्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उद्घाटन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 382 विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक कलाकृती सादर केली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला सिपना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल घाडगे, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक रवींद्र मतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, डॉ. रवींद्र आंबेकर, सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्रिया देशमुख, डॉ. संजय खेरडे, शेखर पाटील, राजकुमार अवसरे यांसह आदी उपस्थित होते.

हेही वाचा - शिवसेनेत बच्चू कडू विरुद्ध अब्दुल सत्तार, ...तो अधिकार सत्तारांना नाही

या सोहळ्यात यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणातून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, समाजात महिलांवरील अत्याचार मुलींच्या अंगावर अॅसिड फेकणे अशा अनेक स्वस्थ करणार्‍या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीमध्ये नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे. हे नवे तंत्रज्ञान अंगीकार करताना चांगली मुल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. ज्ञान मिळवण्यासाठी सकारात्मक विचार व सातत्य उजळणी आवश्यक आहे. चांगल्या विचाराचा सकारात्मक पाठपुरावा केल्याने नक्की यश मिळते, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

हेही वाचा - कर्जमाफीच्या मुद्यावरुन बच्चू कडूंचा बँकांवर गंभीर आरोप

इंस्पायर अवार्ड उपक्रमातून ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. अनेक विद्यार्थी नवे संशोधन करून पेटंट ही मिळवितात अशा अभिनव अविष्कार यांसाठी उद्योजकांकडून आर्थिक सहकार्य मिळवून देऊ, असेही यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - कवडीमोल दर..! अमरावती जिल्ह्यातील हजारो क्विंटल तूर खासगी व्यापाऱ्यांच्या घशात

Intro:इंस्पायार्ड अवार्ड प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास होतो. आज इन्स्पायर्ड भारत त् घडवायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नव्या आयुष कारणांबरोबरच ीती आणि मूल्यांचे भानही नव्या पपिढीत रुजविणे आवश्‍यक असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. अमरावतीच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात आज यशोमती ठाकूर यांच्या हस्ते राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Body:शालेय शिक्षण विभागातर्फे सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित नव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 382 विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक कलाकृती सादर केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेत आयोजित या सोहळ्याला सिपना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल घाडगे, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक रवींद्र मतकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर ,डॉ.रवींद्र आंबेकर सहसंचालक तेजराव काळे, शिक्षणाधिकारी निलिमा टाके, प्रिया देशमुख, प्रा. डॉ. संजय खेरडे, शेखर पाटील, राजकुमार अवसरे, प्रामुख्याने उपस्थित होते.
या सोहळ्यात यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणातून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या समाजात महिलांवरील अत्याचार मुलींच्या अंगावर ॲसिड फेकणे अशा अनेक स्वस्थ करणार्‍या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर नव्या पिढीमध्ये नीतिमूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. ' अध्यात्म व विज्ञान से हो संसार का भला' ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण आहे हे नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करताना चांगली मुले आत्मसात करण्याची ची गरज आहे. ज्ञान मिळविण्यासाठी सकारात्मक सातत्य व उजळणी आवश्यक आहे चांगल्या विचाराचा सकारात्मक पाठपुरावा केल्याने नक्की यश मिळते असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
इंस्पायर अवार्ड उपक्रमातून ग्रामीण भागासह देशातील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते अनेक विद्यार्थी नवे संशोधन करून पेटंट ही मिळवितात अशा अभिनव अविष्कार यांसाठी उद्योजकांकडून आर्थिक सहकार्य मिळवून देऊ असेही ही यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले ले जा सोबती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध आविष्कार बद्दल कौतुक केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.