ETV Bharat / state

कोथिंबीरचे भाव 200 नाही 500 रुपये किलोपेक्षाही जास्त झाले पाहिजे - भाजीपाल्यांचे दर

शेतकऱ्यांच्या मालाचा थोडा भाव वाढला तर अनेकांच्या पोटामध्ये दुखू लागते. कोथिंबीर खाल्ली नाही तर कुणी मरत नाही. त्यामुळे भाव वाढले म्हणून ओरडू नका असे बच्चू कडू म्हणाले.

कोथिंबीर
कोथिंबीर
author img

By

Published : Oct 21, 2021, 8:34 AM IST

अमरावती - पावसामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. त्यात पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मागील काही दिवसात भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहे. त्यात भाजीला स्वाद आणणारी कोथिंबीर 200 रुपये किलोपर्यंत गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले अशा बतम्या येत आहेत. वाढलेल्या भाजीपाल्यांच्या किंमती कमी करण्याची मागणी होत असतानाच वाढत्या भाजीपाल्याच्या आणि कोथिंबीरच्या वाढत्या किंमतीचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर समर्थन केले आहे. कोथिंबीरचे भाव 200 नाही तर 500 रुपये किलोपेक्षाही जास्त झाले पाहिजे, अशी इच्छा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

कोथिंबीरचे भाव 200 नाही तर 500 रुपये किलोपेक्षाही जास्त झाले पाहिजे

कोथिंबीर खाल्ली नाही मरत नाही -

शेतकऱ्यांच्या मालाचा थोडा भाव वाढला तर अनेकांच्या पोटामध्ये दुखू लागते. कोथिंबीर खाल्ली नाही तर कुणी मरत नाही. त्यामुळे भाव वाढले म्हणून ओरडू नका असे बच्चू कडू म्हणाले.

तर स्वस्त धान्य दुकानातून वाटप करा -

भाजीपाल्यांचे दर कडाडल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. नेहमीच तोट्यात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत असेल तर ते चांगलेच आहे. त्यामुळे लोकांनी याचा बाहू करू नये. तसेच सर्वसामान्य लोकांना जर वाढलेल्या किंमतीमध्ये भाजीपाला घेणे शक्य होत नसले तर शासनाने त्यांच्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून भाजीपाल्यांचे वाटप करावे, असेही मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.