अमरावती - महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली २ लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. असे वक्तव्य करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता यात शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी उडी घेत. बच्चू कडू यांना २ लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला अब्दुल सत्तारांनी लगावला आहे. या त्यांच्या टीकेला आज (शनिवारी) बच्चू कडूंनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'
अब्दुल सत्तार यांच्या टीकेला उत्तर देणार नाही ते बच्चू कडू कसले. त्यांनीही अब्दुल सत्तार यांना टोला लगावत सरकारपर्यंत माहिती पोहोचवने हा काही गुन्हा नाही. ते सरकारच्या विरोधत नाही. आमदार आणि मंत्री म्हणून आमचे ते कामच आहे. ज्या चुका प्रशासनाकडून होत आहेत, त्या चुका सरकारने दुरुस्त केल्या पाहिजेत. त्यामुळे अब्दुल सत्तारांना तो अधिकार नाही, त्यांनी त्यांच बघाव अस म्हणत बच्चू कडूंनीही सत्तारांना टोला लगावला.
हेही वाचा - मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी