अमरावती - हिंगणघाटसारखी घटना होण्याआधीच सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. तसेच हिंगणघाट, औरंगाबादसारख्या घटना घडणे, हा प्लॅन नाही तर एक प्रकारची विकृती आहे. म्हणून अशा विकृतीचा सर्व्हे होणे गरजेचे आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. राज्यात होत असलेल्या जळीतकांडाच्या घटनांवर त्यांनी हे भाष्य केले आहे.
वर्ध्यातील हिंगणघाट प्राध्यापिका जळीत प्रकरण उलटत नाही तेच नाशिकमध्ये एक महिला जिवंत पेटल्याची घटना घडली. वारंवार अशा घटना होत आहेत. हा विकृतीचा प्रकार आहे. तर पोलिसांना अशा घटनेची पूर्व सूचना मिळत असते. मात्र, पोलिसांकडून तत्काळ कारवाई केली जात नाही. म्हणून अशा विकृतांचा एक सर्व्हे होणे गरजेचे आहे आहे, असे मंत्री कडू म्हणाले आहे.
हेही वाचा - 'ताई तुम्ही लवकर बऱ्या व्हाल, मुलांची चिंता करू नका' मुख्यमंत्र्यांनी घेतली पीडितेची भेट