अमरावती - मागील काही दिवसांपूर्वी राज्यात दूध दरवाढीसाठी भाजप, रासप, रयत क्रांती, शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. परंतु, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा दूध आंदोलन हे पेटणार आहे. भाजप व युती पक्षांकडून हे आंदोलन करण्यात येणार असून १३ ते १९ ऑगस्टदरम्यान राज्यातील ५ लाख दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दूध दरवाढीसंदर्भात पत्र लिहिणार असल्याची माहिती माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला अपेक्षित भाव मिळालेला नाही. त्यामुळे दुधाला तीस रुपये, भाव गाईच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान, दूध पावडर निर्यातीला ५० रुपये अनुदान द्यावे, ही मागणी ही भाजप व मित्र पक्षाची आहे. या दरवाढीसंदर्भात मागील महिन्यात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. त्यानंतर राज्यभर आंदोलन करुनही शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हे आता मुख्यमंत्री यांना ५ लाख दूध उत्पादक शेतकरी हे पत्र लिहणार असल्याचेही माजी कृषी मंत्री अनिल बोंडे म्हणाले.
राज्यात पुन्हा दूध आंदोलन पेटणार; ५ लाख दूध उत्पादक लिहिणार मुख्यमंत्र्यांना पत्र - Amravati milk agitation news
भाजप व युती पक्षांकडून हे आंदोलन करण्यात येणार असून १३ ते १९ ऑगस्टदरम्यान राज्यातील ५ लाख दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दूध दरवाढीसंदर्भात पत्र लिहिणार असल्याची माहिती माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.