अमरावती - सोमवारी रात्री शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. कडाक्याच्या उन्हात पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री १२ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. पहाटे ४ वाजवपर्यंत रिमझिम पाऊस पडतच होता. पावसासोबतच सुसाट्याचा वाराही वाहत होता. आज सुद्धा आकाशात ढग दाटून आले असून पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.