ETV Bharat / state

Melghat Tiger Reserve : देशात वाघांसाठी मेळघाट सर्वात सुरक्षित प्रदेश, 47 वाघांचे वास्तव्य - मेळघाटातील वाईल्डलाईफ क्राईम सेल

जगातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असताना भारतात मात्र वाघाची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ( Melghat Tiger Reserve ) वाघाच्या सुरक्षेसाठी उत्कृष्ठ कार्य केल्यामुळे हा प्रकल्प देशात वाघांसाठी सर्वात सुरक्षित ( Melghat Tiger Reserve Most Safe Zone For Tiger ) प्रकल्प ठरला आहे. मेळघाटात 2021 च्या गणनेनुसार 47 वाघ आढळून आले आहेत. त्यामुळे मेळघाटात पर्यटकांचा ओढा वाढणार आहे.

Melghat Tiger Reserve
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 15, 2022, 5:39 PM IST

Updated : Dec 16, 2022, 12:24 PM IST

अमरावती - वाघांची सफारी करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प ( Tadoba-Andhari National Park ) हा देशभरात सुप्रसिद्ध आहे. मात्र व्याघ्र संरक्षणाबाबतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प ( Melghat Tiger Reserve Most Safe Zone For Tiger ) देशात आघाडीवरील प्रकल्प ठरला आहे. 2021 च्या वन्यप्राणी गणनेनुसार मेळघाटात एकूण 47 वाघांचे वास्तव्य आहे.

देशात वाघांसाठी मेळघाट सर्वात सुरक्षित प्रदेश, 47 वाघांचे वास्तव्य

व्याघ्र संवर्धन उद्दिष्टपूर्ती - विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या ( Special Tiger Protection Force ) कर्मचाऱ्यांचे सहकार्य व वाईल्डलाईफ क्राईम सेलची ( Wildlife Crime Cell ) गतिमान अन्वेषण कार्यवाही यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी अपेक्षित उद्दिष्ट्यपूर्ती शक्य होत आहे. मॉनीटरिंग सिस्टीम फॉर टायगर्स इंटेसिव्ह प्रोटेक्शन अँड इकॉलॉजिकल स्टेटस’द्वारे (एमएसटीआरआयपीईएस) निर्धारित निकष पूर्ण करणाऱ्या प्रकल्पात मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशात अग्रेसर ठरल्याची माहिती विभागीय वनाधिकारी एम. एन. खैरनार यांनी दिली.

विशेष व्याघ्र संरक्षण दलाची कामगिरी - विशेष व्याघ्र संरक्षण दलात ( Special Tiger Protection Force ) सहायक वन संरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वननिरीक्षक यांची एकूण 112 पदे आहेत. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एकूण तीन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत वनक्षेत्रपालांच्या अखत्यारीत 27 वनरक्षक व 9 वननिरीक्षक आहेत. गुगामल वन्यजीवन विभाग, परतवाडा येथील चिखलदरा सिपना वन्यजीव विभाग ( Chikhaldara Sipna Wildlife Division ) व अकोट वन्यजीव विभाग यात प्रत्येकी एक याप्रमाणे तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धनावर भर - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ( Melghat Tiger Reserve ) 6 वन्यजीव विभागात वनरक्षकांची एकूण 460 मंजूर पदे आहेत. मागील दोन वर्षात अमरावती वनवृत्तात 153 वनरक्षकांची वनपाल पदावर पदोन्नती झाल्याने मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. त्यामुळे विशेष व्याघ्र संरक्षण दलातील ( Special Tiger Protection Force ) वनरक्षक व वननिरीक्षक यांना नियतक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. एकूण 102 वनरक्षक व वननिरीक्षकापैकी 71 जणांना संवेदनशील नियतक्षेत्राचा कार्यभार देण्यात आलेला आहे. यामुळे रिक्त पदे असली, तरीही त्या क्षेत्रात वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने नियमित गस्त व दैनंदिन कामे योग्य रितीने करणे शक्य झाले आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाची ( Special Tiger Protection Force ) निर्मिती ही गस्तीव्दारे व्याघ्र संवर्धन करणे या उद्देशाने करण्यात आली होती. त्यामुळे या उद्देशास कुठलाही धक्का पोहोचत नाही, असे विभागीय वनाधिकारी खैरनार यांनी सांगितले आहे.

क्राईम सेलची धडाडी - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ( Melghat Tiger Reserve ) मेळघाट वाईल्डलाईफ क्राईम सेलची ( Wildlife Crime Cell ) निर्मिती 2013 मध्ये झाली. हा सेल मेळघाट व्याघ्र प्रकल्प व महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील वन विभागांना देखील वेळोवेळी सायबर डेटा ( Cyber ​​data ) व गुप्त माहिती पुरविण्याचे काम अविरतपणे करीत आहे. सेलव्दारे मागील एक वर्षात 88 वन गुन्हा प्रकरणांमध्ये सुमारे 146 संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. गत सहा महिन्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ( Melghat Tiger Reserve ) घडलेल्या चार वन गुन्ह्यांमध्ये सेलव्दारे तातडीने आरोपींना अटक व गुन्ह्यामागील पुरावे शोधून काढण्याची मोलाची कामगिरी पार पडली आहे. या कार्यवाहीमुळे वन्यजीवांसंदर्भातील गुन्हेगारीवर चाप बसविणे शक्य झाले आहे

Last Updated : Dec 16, 2022, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.