ETV Bharat / state

Melghat Tiger Reserve : अमरावती जिल्ह्याच्या पेचात मानाचा तुरा; मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानांकनाचा दर्जा

ग्लोबल टायगर फोरम (GTF) ने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला कंझर्व्हेशन अॅश्युअर्ड टायगर स्टँडर्डचा (CATS) दर्जा जाहीर केला आहे. या प्रकल्पाने व्याघ्र संवर्धनासाठी आवश्यक मापदंडांची पूर्तता केल्यामुळे हा सन्मान मिळाला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात वनसंपन्न अमरावती जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे.

Melghat Tiger Reserve
Melghat Tiger Reserve
author img

By

Published : Apr 1, 2023, 9:59 PM IST

Updated : Apr 2, 2023, 7:54 PM IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानांकनाचा दर्जा

अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट या व्याघ्र प्रकल्पाला कॅट्स अर्थात कंजर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टॅंडर्ड या जागतिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आजवर केलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हे मानांकन प्राप्त झाले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी काळात अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हे आहे मेळघाटचे वैशिष्ट्य : मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेला देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वत रांगा, उंच सागवान वृक्ष, मिश्र वनपट्टे, धबधबे यांनी समृद्ध असलेल्या मेळघाटात गौर, सांबर या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत भरपूर जैवविविधता आहे. राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळाल्याने प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे.

सात विषयांचा तपास अहवाल : व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्त्व, व्यवस्थापन नियोजन, स्थानिक समुदाय, पर्यटन, संरक्षण, अधिवास विकास, वाघांची संख्या अशा सात विषयांवर केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला.

टायगर फोरमकडे प्रकल्प : मंचाच्या पथकाने व्याघ्र प्रकल्पातील विविध ठिकाणी भेट देऊन या कामांची पाहणी केली. या टीममध्ये सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक दर्जाचे अधिकारी सहभागी होतात. टीमने प्रत्यक्ष काम, व्यवस्थापनाचा दर्जा, संरक्षणाची गुणवत्ता याची पाहणी करून ग्लोबल फोरमला अहवाल सादर केला. त्यानुसार मंचाने ग्लोबल स्टँडर्ड प्रकल्प जाहीर केला आहे.

सर्वांच्या सहकार्याने सन्मान : 'मांजरा'नंतर 'व्यवस्थापन प्रभावी मूल्यमापन'द्वारे विविध विषयांची पाहणी करून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला सकारात्मक गुण मिळतील, असा विश्वास व्यक्त करून यादव तरटे यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे मेळघाटला हा सन्मान मिळाल्याचे सांगितले.

खास पथकाने केली पाहणी : कंजर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टॅंडर्ड मानांकन मिळण्यापूर्वी फोरमच्या खास पथकाने मेळघाटातील विविध ठिकाणची पाहणी केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे सातपुडा पर्वत रांगेतील सामाजिक संबंध यासह येथील सांस्कृतिक वैशिष्ट्य आदिवासी परंपरा जंगल सुरक्षेसाठी करण्यात आलेले व्यवस्थापन, वाघांच्या दृष्टीने घेतली गेलेली काळजी ही संपूर्ण पाहणी या पथकाने केल्यावर याबाबतचा अहवाल ग्लोबल फोरमला सादर केला.

कंजर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टॅंडर्ड मानांकन : या अहवालानुसार ग्लोबल फोरमच्या वतीने कंजर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टॅंडर्ड हे मानांकन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जाहीर करण्यात आले. मेळघाटला मिळालेला ह्या सन्मानामुळे मेळघाटातील अति दुर्गम ठिकाणी सेवा देणारे व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी देखील ही गौरवाची बाब आहे. वन्यजीव प्रेमींमध्ये देखील मेळघाटला मिळालेल्या जागतिक मानांकनामुळे आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - Pune Lok Sabha By Election : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्यात राजकीय खलबते सुरू

Last Updated : Apr 2, 2023, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.