ETV Bharat / state

Girl Student Suicide : अमरावतीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

author img

By

Published : May 17, 2023, 2:01 PM IST

Updated : May 17, 2023, 8:53 PM IST

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वस्तीगृहात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील खासगी वस्तीगृहात घडली आहे.

girl student committed suicide
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

अमरावती : अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वस्तीगृहात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना राजापेठ परिसरातील खासगी वस्तीगृहात घडली आहे. ऋतुजा ढेंगरे(23) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

खासगी वस्तीगृहात घेतला गळफास : या घटनेप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा ही मूळची परभणी येथील रहिवासी होती. ती अमरावती शहरातील होमिओपॅथी महाविद्यालयात बीएचएमएस च्या द्वितीय वर्षात शिकत होती. महाविद्यालयाच्या परिसरातच असणाऱ्या खासगी वस्तीगृहात तिसऱ्या माळ्यावरच्या खोली ती राहत होती. आज सकाळी ती खोली बाहेर निघाली नसल्याने केअर टेकर ने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. मग त्या केअर टेकरने ऋतुजाच्या खोलीत डोकावून पाहिले, त्यानंतर त्याला ती गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसली.

पोलीस करीत आहेत तपास : बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांचे पथक खासगी वस्तीगृहात पोहोचले. पोलिसांनी ऋतुजाचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. ऋतुजाने टोकाचे पाऊल का उचलले याची चौकशी राजापेठ पोलीस करत आहेत. तिच्या मित्र-मैत्रिणींसह महाविद्यालयातील प्राध्यापकांची देखील पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात : विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचे प्रकरण दिवसेंदिवस वाढू लागली आहेत. मागीलवर्षीही शिक्षक कॉलनीत मृणाल वानखडे नावाच्या इंजिनिअरींग करणाऱया मुलीने आत्महत्या केली होती. एका नववीत शिकाणाऱ्या मुलीनेही आत्महत्या केल्याची घटना मागीलवर्षी अमरावतीत घडली होती. दरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक होतात. परीक्षेत नापास होण्याची भीती, विषयाचे पेपर अवघड गेले, चांगले मार्क मिळाले नाही तर विद्यार्थी तणावात जात असतात असतात. याच तणावातून ते टोकाचे पाऊल उचलत असतात. या करणाबरोबर नातेसंबंधामधील तणाव, स्पर्धा यामुळेही विद्यार्थी आत्महत्या करतात.

हेही वाचा -

  1. Thane Crime : 'संडे, मंडे'चे 'स्पेलिंग' येत नाही, म्हणून सहा वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षिकेकडून अमानूष मारहाण
  2. Woman Intruder : पाकच्या संशयित महिलेचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी पाडला हाणून, गोळीबारात महिला ठार
  3. Amravati Crime News: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, भाजपच्या माजी नगरसेवकांसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : May 17, 2023, 8:53 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.