ETV Bharat / state

MD Drugs Seized In Amravati : अमरावतीतून 57 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई - MD Drugs Seized In Amravati

संपूर्ण राज्यभरातून एमडी ड्रग्स जप्तीच्या घटना पुढे येत आहे. अशातच अमरावतीतून 57 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला येथून अमली पदार्थ विक्रीसाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली होती. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तरुणांकडून ५७ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे.

MD Drugs Seized In Amravati
अमरावतीत एमडी ड्रग्ज जप्त
author img

By

Published : Jan 24, 2023, 9:35 PM IST

अमरावतीतून 57 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

अमरावती : अंजनगाव सूर्जी तालुक्यातील कारला या ठिकाणी अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काल सायंकाळी त्यांच्याकडून 57 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

सुर्जी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - काल उशिरापर्यंत ही कारवाई अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात सुरु होती. सापडलेल्या दोन्ही आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया काल उशिरापर्यंत सुरू होती. राज्यामध्ये अलीकडच्या काळात एमडी ड्रग्स पकडण्याच्या मोहिमेने गती घेतली आहे. परंतु ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच कारवाई असल्याचे समजते. अलिकडच्या काळात एमडी ड्रग्स पकडण्याची ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच मोठी कार्यवाही ठरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ वर्षीय दोन तरूण सोमवारी दुपारी अंजनगाव अकोट मार्गावरील कारला येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या बाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात येऊन अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा, अंजनगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्या दोघांना दुपारी तीनच्या सुमारास अटक केली.

1.71 लाखांचे ड्रग जप्त - अंजनगाव सुर्जी येथील अंजनगाव अकोट या मार्गावर कारला या गावी पोलिसांना दोन जण ड्रग विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अधारे दोन बावीस वर्षे तरुण दुपारच्या सुमारास एमडी ड्रग्स विक्रीसाठी घेऊन आले. त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्या दोघांन अटक केली. त्यांच्याकडून 57 ग्रॅम जप्त करण्यात आले आहे. या ड्रगची किंमत 3 हजार रुपये प्रति ग्रॅम आहे. 57 ग्रॅमची एकुण किंमत सुमारे 1.71 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांचा तपास सुरु? - त्या तरुणांकडून जप्त केलेले एमडी ड्रग्स नेमके कुणाचे होते? यामध्ये असलेले दलाल कोण आहेत? याविषयी पोलीस आरोपींना विचारणा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यातील 21 वर्षीय आरोपी शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील तर, दुसरा आरोपी आरोपी हा अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी आहे.

दोन्ही आरोपींची अंजनगाव पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदाने, पंकज फाटे, सय्यद अजमत, रवींद्र बावणे ,गजेंद्र दाबणे नितेश डांगोरे यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - Bench Hits Shinde Fadnavis : औरंगाबाद खंडपीठाचा शिंदे-फडणवीसांना दणका; वाचा काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.