ETV Bharat / state

अमरावतीच्या महापौरपदाची निवडणूक होणार पंचरंगी

author img

By

Published : Nov 19, 2019, 12:13 PM IST

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत महापौरपदासाठी एकूण 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत तर उपमहापौर पदासाठी 7 नगरसेवक इच्छुक आहेत.

महापौरपदाची निवडणूक होणार पंचरंगी

अमरावती- येथील सोळाव्या महापौरपदाची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार आहे. महापौर पदासाठी भाजपसह काँग्रेस, शिवसेना, बसपा, एमआयएम अशा सर्वच पक्षातील नगरसेवक इच्छुक असल्याने महापौरपदाची निवडणूक पंचरंगी होईल असे चित्र आहे.

महापौरपदाची निवडणूक होणार पंचरंगी

हेही वाचा- सियाचीनमध्ये हिमस्खलन होऊन 4 जवानांसह 6 जणांचा मृत्यू

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत महापौरपदासाठी एकूण 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत तर उपमहापौर पदासाठी 7 नगरसेवक इच्छुक आहेत. महापौरपदासाठी भाजपचे चेतन गावंडे, बसपाच्या माला देवकर, काँग्रेसचे विलास इंगोले आणि प्रदीप दिवसे तसेच एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या कुसुम साहू, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या सुमती ढोके, बसपाच्या इर्षद बांनो मंनान खान, शिवसेनेचे डॉ. राजेंद्र तायडे एमआयएमचे मोहम्मद साबिर मोहम्मद नासिर आणि अब्दुल नाझिम अब्दुल राऊफ यांच्यासह बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे बसपाचे गटनेते चेतन पवार यांच्या उमेदवारी अर्जावर माजी महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेवक वंदना कंगाले आणि अस्मा फिरोज खान यांची सूचक म्हणून स्वाक्षरी आहे.

भाजपच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक
अमरावती महापालिकेत एकूण 87 नगरसेवक असून यापैकी भाजपच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक 45 इतकी आहे. भाजपच्या गटामध्ये युवा स्वाभिमान पार्टीचे तीन नगरसेवक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा एक नगरसेवक आहे. या गटाची एकूण संख्या 49 नगरसेवकांची आहे. अमरावती महापालिकेत काँग्रेसचे एकूण 15 नगरसेवक आहेत. तर एमआयएमचे 10, बसपाचे 5, शिवसेनेचे 7, आणि एक अपक्ष नगरसेवक आहे.

भाजपच्या नगरसेवकांना फोडणे हा एकमेव पर्याय
महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे जवळपास स्पष्ट आहे. मात्र, भाजप विरोधात इतर सर्व पक्ष एकत्रित आले. त्यांनी भाजपच्या गटातील युवा स्वाभिमान पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगरसेवकाला सोबत घेतले तरी भाजपला कुठलीही महापौरपदाच्या निवडणुकीत अडचण येणार नाही हे स्पष्ट आहे. भाजपमधील नगरसेवकांना फोडणे हा एकमेव पर्याय इतर पक्षांसमोर राहणार आहे. भाजपमधील एकही नगरसेवक फुटणार नाही हे सुद्धा तितकेच स्पष्ट आहे. महापौरांच्या पदावर भाजपचाच नगरसेवक विराजमान होईल हे स्पष्ट असले तरी 22 तारखेला निवडणूकीच्या दिवशी मात्र चांगलाच गोंधळ उडणार हे स्पष्ट आहे.

Intro:अमरावतीच्या नव्य सोळाव्या महापौरपदाची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार आहे. महापौर पदासाठी भाजपसह काँग्रेस शिवसेना बसपा एमआयएम अशा सर्वच पक्षातील नगरसेवक इच्छुक असल्याने महापौरपदाची निवडणूक पंचरंगी होईल असे चित्र आहे.

Body:महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत महापौरपदासाठी एकूण 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत तर उपमहापौर पदासाठी 7 नगरसेवक इच्छुक आहेत. महापौरपदासाठी भाजपचे चेतन गावंडे, बसपाच्या माला देवकर ,काँग्रेसचे विलास इंगोले आणि प्रदीप दिवसे तसेच एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या कुसुम आमदार, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या सुमती ढोके, बसपाच्या इर्षद बांनो मंनान खान, शिवसेनेचे डॉ. राजेंद्र तायडे एमआयएमचे मोहम्मद साबिर मोहम्मद नासिर आणि अब्दुल नाझिम अब्दुल राऊफ यांच्यासह बसपाचे गटनेते चेतन पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे बसपाचे गटनेते चेतन पवार यांच्या उमेदवारी अर्जावर माजी महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेवक वंदना कंगाले आणि अस्मा फिरोज खान यांची सूचक म्हणून स्वाक्षरी आहे.
अमरावती महापालिकेत एकूण 87 नगरसेवक असून यापैकी भाजपच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक 45 इतकी आहे. भाजपच्या गटामध्ये असणाऱ्या युवा स्वाभिमान पार्टीचे तीन नगरसेवक असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा एक नगरसेवक भाजपचा गटात असून या गटाची एकूण संख्या 49 नगरसेवकांची आहे.
अमरावती महापालिकेत काँग्रेसचे एकूण 15 नगरसेवक आहेत तर एम आय एमचे 10 बसपाचे 5 शिवसेनेचे 7 आणि एक अपक्ष नगरसेवक आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे जवळपास स्पष्ट असले तरी भाजप विरोधात इतर सर्व पक्ष एकत्रित आले आणि त्यांनी भाजपच्या गटातील युवा स्वाभिमान पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नगरसेवकाला सोबत घेतले तरी भाजपला कुठलीही महापौरपदाच्या निवडणुकीत कुठलीही अडचण येणार नाही हे स्पष्ट आहे. भाजपातील नगरसेवकांना फोडणे हा एकमेव पर्याय इतर पक्षांसमोर राहणार असून भाजपातील एकही नगरसेवक फुटणार नाही हे सुद्धा तितकेच स्पष्ट आहे. महापौरांच्या पदावर भाजपचाच नगरसेवक विराजमान होईल हे स्पष्ट असले तरी 22 तारखेला निवडणूकीच्या दिवशी मात्र चांगलाच गोंधळ उडणार हे स्पष्ट आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.