अमरावती - काल सर्वोच्च न्यायालायने आरक्षणासंदर्भात निकाल देत आरक्षण रद्द केले. यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकार एकमेकांना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतानाच आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चांगल्या पद्धतीने भूमिका मांडली होती. मात्र, राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालात भूमिका मांडता आली नाही. हे ठाकरे सरकारचे अपयश असून त्यांच्या मुळेच मराठा समाजाच्या आरक्षण रद्द झाल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
मराठा समाजाला झाला असता मोठा फायदा
मराठा समाजातही शेतकरी मजूर गोरगरीब लोक आहे. जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, तर याचा फायदा निश्चितच मराठा समाजातील या गोरगरीब शेतकरी शेतमजूर कुटुंबातील लोकांना झाला असता. परंतु न्यायालयाने दिलेला हा निर्णय अनपेक्षित आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील लोकांचा मोठे नुकसान होणार असल्याचेही आमदार रवी राणा म्हणाले.
हेही वाचा - आई वडिलांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत अडकलेल्या चिमुकलीच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे