ETV Bharat / state

व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशींचे सदस्यत्व कुलगुरूंनी ठरवले अपात्र

मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर असा कुठलाही ठपका नसताना कुलगुरूंनी माझ्या बाबतीत बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध मी लढा देईल आणि एक महिन्यात विद्यापीठात परत येणार, अशी आशा व्यक्त करत आता कुलगुरूंनी केलेले सगळे बेकायदेशीर कृत्य चव्हाट्यावर आणणार, असा इशाराही प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी दिला.

management council member prof dinesh suryavanshis membership disqualified by vice chancellor
प्रा. दिनेश सूर्यवंशीं
author img

By

Published : Oct 26, 2020, 8:49 PM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य असणाऱ्या प्रा. दिनेश सूर्यवंशी यांचे सदस्यत्व कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी अपात्र ठरविले आहे. कुलगुरूंच्या या भूमिकेविरुद्ध आता आपण कायदेशीर लढा देऊ तसेच कुलगुरूंनी आजवर केलेले भ्रष्टाचार उजेडात आणू असा इशारा सदस्यत्व रद्द झाल्यावर संतप्त झालेल्या प्रा.दिनेश सूर्यवंशी यांनी दिला आहे.

व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यास विद्यापीठ अपयशी ठरले असल्याने आता परीक्षा घेण्याची जबाबदारी विद्यापीठाने महाविद्यालयावर लादली आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेला प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी तीव्र विरोध करत वेळप्रसंगी विद्यार्थी हितासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्या या भूमिकेमुळे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी प्रा. दिनेश सूर्यवंशी यांचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेऊन तशी अंमलबजावणी केली. यासंदर्भात भाष्य करण्यास कुलगुरू आणि कुलसचिवांनी टाळले असताना स्वतः प्रा.दिनेश सूर्यवंशी यांनी मात्र माझे व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यत्व रद्द केल्याचे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

2019 मध्ये माझ्या अध्यक्षतेत गठीत समितीचा अहवाल देण्यास उशीर झाला तसेच महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्यास मी विरोध केल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे कारण कुलगुरूंनी दिल्याचे प्रा.दिनेश सूर्यवंशी म्हणाले. मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर असा कुठलाही ठपका नसताना कुलगुरूंनी माझ्या बाबतीत बेकायदेशीर निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध मी लढा देईल आणि एक महिन्यात विद्यापीठात परत येणार, अशी आशा व्यक्त करत आता कुलगुरूंनी केलेले सगळे बेकायदेशीर कृत्य चव्हाट्यावर आणणार, असा इशाराही दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.