मिर्झापूर - अमरावतीमधील भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये २६ लोक जखमी झाले आहेत. मिर्झापूर येथील हलिया परिसरातील ड्रमंडगंज घाटात बसचा अपघात झाला. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती भाविकांनी दिली.
बसमध्ये २८ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी अमरावतीवरून वाराणसीतील सारणाथमधील बोधगया येथे दर्शनासाठी जात होते. जखमी झालेल्या २६ भाविकांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.