ETV Bharat / state

Uddhav Thackeray News : सरकार आता मतपेट्यांऐवजी खोक्यांमधून येते, हे दुर्दैव- उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर निशाणा - Uddhav Thackeray press conference today

राजकीय चित्र आता फार बदलत चालले आहे. पूर्वी मतपेट्यांमधून सरकार स्थापन व्हायचे. आता दुर्दैवाने मतपेट्यांऐवजी खोक्यांमधून सत्ता येत असल्याची खंत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. विदर्भ दौऱ्यावर असणारे उद्धव ठाकरे आज अमरावतीसह अकोल्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी अमरावतीत संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

Uddhav Thackeray Amravati Visit
उद्धव ठाकरे यांची अमरावतीत पत्रकार परिषद
author img

By

Published : Jul 10, 2023, 12:58 PM IST

उद्धव ठाकरे यांची अमरावतीत पत्रकार परिषद

अमरावती : उद्धव ठाकरे आज अमरावतीमध्ये आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या देशातील भाजप सरकार विरोधात नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद पवार काँग्रेस, शिवसेना असे सर्वच विरोधक एकत्र आले असल्या संदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा सरकार विरोधात एकत्र येणाऱ्यांना विरोधक म्हणणे योग्य नाही तर हे सारे देशप्रेमी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राण्यांची आहुती दिली, रक्त सांडले असे असताना स्वातंत्र्याचा ऱ्हास होणार नाही, यासाठी देशभरातील देश प्रेमी एकत्र येत आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा जुळायला हवे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

'राईट टू रिकॉल'ची मागणी : आता खोक्यांच्या बळावर दमदाटी करून कोणीही पंतप्रधान होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. या संपूर्ण परिस्थितीबाबत मी अनेकदा विचार केला. खरंतर फार पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशात 'राईट टू रिकॉल' असावा अशी मागणी केली होती. 'राईट टू रिकॉल'ची मागणी ही अतिशय योग्य असल्याचे आजची परिस्थिती पाहून जाणवते असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

विश्वास असणाऱ्या शिवसैनिकांच्या भेटीसाठी : आता पावसाळा संपल्यावर देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या, त्यामध्ये शिवसेनेवर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. त्यांना भेटण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे. फार पूर्वीपासून पक्ष फोडण्याचे राजकारण राज्यात आणि देशात सुरू आहे. आता मात्र थेट पक्ष चोरला जातो आहे, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

राणांबाबत भाष्य करण्यास टाळले : उद्धव ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर येत असताना त्यांच्या स्वागतासाठी शहरभर लागलेले पोस्टर राणा समर्थकांनी फाडले. त्यामुळे अमरावती शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. राणांच्या या प्रकारासंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राणांबाबत कुठलेही भाष्य करण्यास टाळले. अमरावतीत अनेक वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येतो आहे. मागच्या निवडणुकीमुळे काही गडबड झाली आणि शिवसेनेचा पराभव झाला. मात्र जे कोणी निवडून आले ते फार काळ टिकणार नाहीत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

  1. Uddhav Thackeray Amravati Visit: उद्धव ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर, राणांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त
  2. Maharashta Political Crisis: अर्थ खाते पुन्हा एकदा अजित पवारांकडे ? शासनाने जारी केलेल्या जीआरमुळे चर्चांना उधाण
  3. Hanuman chalisa Pathan In Amravati: राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणला पोलिसांनी नाकारली परवानगी, 'हे' दिले कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.