अमरावती - कोरोनामुळे ज्या लहान मुलांच्या पालकांचे (आई-वडील) कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा मुलांचा सांभाळ करण्याच प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता 1 ते 23 वयोगटातील मुलांची जबाबदारी ही राज्य सरकारने घेतली आहे. त्यासाठी सरकारकडून आता टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या राज्य सरकारच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार 195 बालकांचे छत्र हरपले आहे. त्यापैकी 87 बालके असे आहे की ज्यांच्या आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला तर तब्बल 108 बालकांचे आई-वडील जग सोडून गेले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आई-वडिलांच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाऊल उचलणारे देशातील महाराष्ट्र पहिले राज्य आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
राज्यात अनेकांचे पालक कोरोनामुळे मरण पावले आहेत. अशा परिस्थितीत काही समाजकंटक लोकांनी मुलांना दत्तक घेण्याच्या व फसवणुकीच्या घटना समोर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने निर्णय घेतला असून स्वतः या लहान मुलांचा सांभाळ करणार आहे. राज्यात कोरोनामुळे आता जवळपास 195 बालकांचे छत्र हरपले आहे. त्यापैकी 87 बालके असे आहे की ज्यांच्या आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला तर तब्बल 108 बालकांचे आई-वडील जग सोडून गेले आहे. त्यामुळे या मुलांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून या लहान मुलांना आधार मिळणार आहे.
हेही वाचा - रेमडेसिवीरच्या काळा बाजाराविरोधात अमरावतीत रुग्णालयात मुंडन आंदोलन